रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये (आरपीएफ) अग्निवीरांसाठी आरक्षण धोरणही विचाराधीन
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेल्वेने लष्कराच्या ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत निवृत्त अग्निवीरांना आपल्या विविध विभागांतर्गत अराजपत्रित पदांवर थेट भरतीमध्ये 15 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच ‘अग्निवीर’ना वयोमर्यादा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीतही सूट दिली जाणार आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्समध्ये (आरपीएफ) अग्निवीरांसाठी आरक्षण धोरणही विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. Railways has decided to provide reservation and other concessions for Agnveer in various posts
प्राप्त माहितीनुसार, रेल्वे ‘लेव्हल-1 आणि लेव्हल-2’ च्या पदांवर ‘अग्निवीर’ना अनुक्रमे 10 टक्के आणि पाच टक्के समांतर आरक्षण देईल. याशिवाय अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि वय यामध्ये सूट दिली जाईल.
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला विहित वयोमर्यादेतून पाच वर्षांची सूट दिली जाईल, तर त्यानंतरच्या तुकडीला तीन वर्षांची सूट दिली जाईल. सूत्रांनी सांगितले की, रेल्वे बोर्डाने सर्व महाव्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात विविध रेल्वे भरती एजन्सींना या सवलतींचा लाभ देण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App