प्रतिनिधी
सोलापूर : वीर सावरकरांबद्दल मलाही आदर होता. पण ज्यावेळी मी त्यांनी लिहिलेले सहा सोनेरी पाने हे पुस्तक वाचले, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मला शंका निर्माण झाली आहे, अशा शब्दांमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हल्लाबोल केला आहे. सोलापूराल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रणिती शिंदे यांनी केवळ सहा सोनेरी पाने या पुस्तकाचा उल्लेख केला नसून त्यांनी हा देश पुढची हजार वर्षे गांधी – नेहरूंचाच राहील. मोदींनी कितीही प्रयत्न केले तरी तो कधीच मोदी – सावरकरांचा होणार नाही, असे शरसंधानही प्रणिती शिंदे यांनी साधले.Congress MLA praneeti shinde targets Veer savarkar
देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्यानंतर राहुल गांधींनी आपली खासदारकी गमावली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी आपले नाव गांधी आहे. सावरकर नाही. त्यामुळे आपण माफी मागणार नाही, असे एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड वाद उफाळला आणि उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी राहुल गांधींना सावरकर मुद्द्यावर बॅकफूटवर पाठवले होते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांच्या सहा सोनेरी पान या पुस्तकावरून त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. प्रणिती शिंदे यांच्या आधी काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांची कन्या आणि युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवानी वडेट्टीवार यांनी देखील आंबेडकर जयंतीच्या एका जाहीर सभेत सावरकरांविषयी असे उद्गार काढले होते. त्यानंतर देखील असाच वाद उफाळला होता. आता आमदार प्रणिती शिंदे यांनी सावरकरांनी विषयी त्याच पद्धतीचे उद्गार काढल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात सावरकर मुद्दा तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App