‘’एकनाथ शिंदे हे रडणारे नाही, लढणारे नेते आहेत, आदित्य ठाकरे स्वत:चं पाप झाकण्यासाठी त्यांच्यावर आरोप करत आहेत’’ संदीपान भूमरेंचा पलटवार!
विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक खळबळजनक विधान केलं होतं. एकनाथ शिंदे हे मातोश्रीवरून येऊन रडत होते. त्यांनी ईडी आणि जेलमध्ये जाण्याच्या भितीने बंडखोरी केली, असं आदित्य़ ठाकरेंनी म्हटलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना(शिंदे गट) मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भूमरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंवर पलटवार केला आहे. तर भूमरेंच्या प्रतिक्रयेननंतर शिवसेना(ठाकरे गट) नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर मोठा दावा केला आहे. Sandipan Bhumre will be guardian minister for only eight days Chandrakant Khaires big claim
मंत्री संदीपान भूमरेंच्या आरोपावर चंद्रकांत खैरे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘’कोण पालकमंत्री, किती दिवस राहतील ते आता? आठ दिवस फक्त. तुम्ही लिहून घ्या माझं वाक्य आहे. सूर्यनारायणाच्या आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या साक्षीने मी सांगतोय, संदीपान भूमरे फक्त आठ दिवस पालकमंत्री राहतील. याचं कारण तुम्हीच शोधा. आता पर्यंत भुमरेंच्या मागे ईडी वैगेरे काही नव्हतं, परंतु आता ईडी लागू शकते. कारण, दोन-सव्वा दोन कोटींची गाडी घेतली आहे, १२ दारूंची दुकाने विकत घेतली आहेत. डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला निर्व्यसनी केलं आहे. परंतु ही लोकं व्यसन लावून दारू दुकानं विकत घेत आहेत. कोणत्या मार्गाने ते नेत आहेत, संत एकनाथ महाराजांनी काय केलंय, जरा संतांच वांड्गमय वाचावं.’’
मंत्री संदीपान भूमरेंनी काय म्हटलं आहे? –
“एकनाथ शिंदे हे रडणारे नाही लढणारे आहेत आणि त्यांनी हे दाखवून दिलं आहे. आपण २०१९मध्ये जी निवडणूक लढलो, ती शिवसेना-भाजपा म्हणून युती आपण केलेली आहे. एकनाथ शिंदे यांचा मातोश्रीवर जाऊन रडायचा काहीच संबंध येत नाही. युती उद्धव ठाकरेंनी केली होती आणि आपण युती म्हणून लढलो. आम्ही निवडून आल्यापासून सांगत होतो की, आपण भाजपासोबतच युती करायची महाविकास आघाडीसोबत करायची नाही, त्यामुळे शिंदेंचा मातोश्रीवर जाऊन रडायचा किंवा ईडीचा काहीच संबंध येत नाही. पण आता काहीतरी आरोप करायचे, अडीच वर्षे सत्ता असताना आपण काही करू शकलो नाही. एकनाथ शिंदे कामं करत आहेत, त्यांची कामेही दिसत आहेत आणि लोक नाव घेत आहेत. म्हणून आता अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत, परंतु यामध्ये कुठेही तथ्य नाही.’’
याशिवाय ‘’आदित्य ठाकरे अडीच वर्षे पर्यटनमंत्री होते, परंतु एका ठिकाणी जाऊनही भूमीपूजन करू शकल नाहीत. कुठे निधी देऊ शकले नाहीत, वेळ देऊ शकले नाहीत. म्हणून स्वत:चं पाप झाकण्यासाठी हे एकनाथ शिंदेंवर आरोप करत आहेत. एकनाथ शिंदे हा रडणारा नेता नाही, तो लढणारा नेता आहे. म्हणून या लढाऊ नेत्यासोबत जाऊन आम्ही त्यांना मुख्यमंत्री केलं आहे. एकनाथ शिंदे स्वत: तयार नव्हते, परंतु आम्ही त्यांना उठाव करायला लावला आहे.’’ असंही भूमरेंनी टीव्ही 9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App