गांधी – सावरकर – आंबेडकर आणि हिंदू समाज सुधारणा

विशेष प्रतिनिधी

महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिनही महापुरुषांची समाज सुधारणे विषयीची मते त्यांच्या विशिष्ट अनुभव आणि कार्यातून बनली होती. या तीनही नेत्यांची राजकीय, सामाजिक, आर्थिक पृष्ठभूमी पूर्णपणे वेगळी आणि विशिष्ट दर्जातून आली होती. अर्थातच त्याचा प्रभाव या तीनही महापुरुषांच्या राजकीय सामाजिक विचारांवर पडला आणि त्यांचे कार्यही समांतर दिशेने सुरू राहिले. पण या तीनही महापुरुषांचे अंतिम ध्येय होते हिंदू धर्म सुधारणा!! Gandhi, savarkar and Ambedkar; their thoughts on hindu social reforms

महात्मा गांधींना हिंदू धर्माची मूलभूत रचना मान्य होती, ती म्हणजे वर्ण व्यवस्था. वर्ण व्यवस्थेत हिंदू धर्म टिकवून ठेवण्याची अनन्यसाधारण शक्ती असल्याचे त्यांचे मत होते. वर्णांमधून निर्माण झालेल्या जाती विशिष्ट समाज व्यवस्था ही काही अंशी आर्थिक व्यवस्था आहे आणि ती तिनेच समाजाला एक एकजिनसी ठेवून टिकवून ठेवले आहे. समाजावर कितीही संकटे आली तरी समाजाची वर्ण व्यवस्थेची वीण तुटली नाही. ज्याचे कारण बाहेरून कितीही धक्के बसले तरी घर आतून मजबूत असेल तर ते टिकून राहते. त्याची थोडी पडझड होते. पण नंतर ते दुरुस्त करता येते, अशी महात्मा गांधींची वैचारिक धारणा होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वर्णाश्रम व्यवस्थेवर अजिबात विश्वास नव्हता. किंबहुना वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे जातीची उतरंड ही हिंदू धर्माची मूलभूत समस्या असल्याची त्यांची धारणा होती. त्यामुळे वर्णव्यवस्था पूर्णपणे मोडून काढल्याशिवाय हिंदू धर्मात आमुलाग्र सुधारणा होणार नाहीत ही त्यांची पक्की धारणा होती. यासाठीच सावरकरांनी सप्तबंदी तोडण्यासाठी हिंदू समाजाला सक्रिय प्रोत्साहन दिले. आधुनिक पाश्चात्य विज्ञानवादाचा पुरस्कार करून हिंदू धर्मात सुधारणा करता येऊ शकतील किंबहुना त्या केल्याच पाहिजे, ही आग्रही भूमिका सावरकरांनी घेतली.

पण सावरकरांच्या भूमिकेमागे 100% समाजकारणाचा भाग नव्हता, असा आरोप त्यांच्या या भूमिकेवर करता येतो करण्यात येतो. ते उपयुक्ततावादी विचारवंत होते म्हणून त्यांनी अस्पृश्य ते विरोधात सुधारण्याचे हत्यार उपसले असे काही विचारवंत म्हणतात. त्याचा व्यत्यास काढून सावरकर मानवतावादी विचारवंत नव्हते, असाही त्यांचा युक्तिवाद असतो. अर्थात सावरकरांच्या स्वतःच्या साहित्यात रूढ अर्थाने किंबहुना गांधीवादी अर्थाने मानवता वादाचा पुरस्कार केला नाही हे उघड आहे. पण म्हणून केवळ उपयुक्ततावादाच्या आधारे त्यांनी हिंदू धर्म सुधारण्याचे प्रयत्न केले हे म्हणणे देखील अन्यायाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महात्मा गांधी पेक्षा पूर्ण भिन्न आणि पूर्णपणे हिंदू धर्मात आमुलाग्र सुधारण्याची राहिली. ते ज्या महार समाजात जन्माला आले, तो समाज पूर्ण तळातला होता. तिथले दुःख, दैन्य आणि अस्पृश्यतेचे दाहक चटके त्यांनी सोचले होते. त्यातूनच त्यांच्या मनात 100% मानवतावादी दृष्टीकोनातून हिंदू धर्म सुधारण्याची बीजे पडली. प्रत्यक्ष गाव कुसाबाहेरचं जगणं आणि समाज बहिष्कृतरुपी वणव्यात होरपळणे म्हणजे काय असते?, हे स्वतःच लहानपणापासून तो ‘जगातलं सर्वोच्च शिक्षण घेतलेल्या उच्च विद्याभूषित झालेल्या तरुणापर्यंत’ स्वतः अनुभवले होते.

मात्र गांधीजी आणि सावरकर हे हिंदू धर्म सुधारण्याचे प्रयत्न आपापल्या विचारानुसार सातत्याने करत राहिले ही वस्तुस्थिती आहे.

अस्पृश्यता निवारण कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे असे तिघांनाही उमजले होते. माझ्यापेक्षा माझा समाज कुत्र्या मांजरांपेक्षाही हीन दीन स्थितीत जगतोय, हे समाज ऋण फेडण्यासाठी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष करणारे बाबासाहेब होते. ह्या संघर्षासाठी आयुष्य वेचणारे भीमराव साधेसुधे नव्हते तर देशातील तत्कालीन नेत्यांमध्ये सर्वात विद्वान, प्रज्ञा पंडित होते. त्यांनी आयुष्यभर अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी विविध आयुधांचा वापर केला. मग ते सर्वसामान्यांना जागृत करणे असो, त्यांच्यासोबत आंदोलन करणे असो, समाज जागृती करिता संशोधन पर ग्रंथ तयार करणे असो, वा कायद्याच्या भाषेत न्याय मिळवून देणे असो, सर्व मार्ग बाबासाहेबांनी अवलंबिले.

सावरकरांचे अस्पृश्यता विरोधी आंदोलन, हे मानवतावादी होते, तसेच राष्ट्रासाठी सुद्धा होते. राष्ट्र बलाढ्य करायचे असेल तर हिंदूंना बलाढ्य केले पाहिजे! त्याकरिता हिंदूतील सर्व जातींना एकत्र केले पाहिजे. जाती जातीत विभागलेला हिंदू , या सर्वांना एकत्र करून सामर्थ्यवान, बलाढ्य हिंदूंचे हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी सावरकरांचं अस्पृश्यता आंदोलन होतं. पशुंना देवांची जननी मानणारे हे हिंदू आपल्याच हाडामासासम असणाऱ्या पुरुषाला असं हे हीनदिन जगणं कसं देऊ शकतात? यावर ते प्रखरतेने विचार मांडून हिंदूंना जागृत करीत. सावरकर फक्त विचारवंत व विचार मांडणारेच नव्हते तर तो विचार प्रत्यक्ष अंमलात आणणारे व तशी कार्यवाही करणारे कृतिवीरही होते.

सावरकरांचा ह्या अस्पृश्यता आंदोलनाचा श्रीगणेशा भगूर- नाशिकचा बालमेळ्यापासून ते पुणे, लंडन आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये सुद्धा दिसून येतो. त्याचे प्रकटीकरण रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत मात्र प्रकर्षाने दिसून आले. शत्रूशी लढताना आपण ज्या स्थितीत असू त्या स्थितीत जे जे करता येईल ते ते त्या व्यक्तीने केलं पाहिजे. रत्नागिरीतील स्थानबद्धतेत प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नाही, हे जाणून नाटकाच्या रूपाने देशाला जागृत करणे, सर्व अस्पृश्यांना धर्माचे सर्व अधिकार देणे. त्यांच्यातील न्यूनगंड नाहीसा करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे. त्यांच्या हस्ते मंदिरातील देवांची पूजा करणे, त्यांच्यासोबत जेवायला बसणे, हिंदू हॉटेलात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी स्वतः प्रयत्न करणे. अशा प्रकारची हिंदू हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देणे. अशी विविध प्रकारची कामे अस्पृश्यता संपवण्यासाठी स्वतः सावरकरांनी रत्नागिरीत राहून केली. रत्नागिरीतील भागोजी कीर यांच्या सहाय्याने बांधलेले पतित पावन मंदिर हे त्यांचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. तिथे पूजा प्रत्यक्ष भंगी बांधवांकडून करून घेतली. ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू…’यासारखी जाती निर्मूलन करणारी गीत लिहून सादर करवली. संगीत उ:षाप नाटकातून अस्पृश्यता विषय समाजासमोर मांडला. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अस्पृश्य सेवेविषयी लिहितात, वीर सावरकरांची अस्पृश्य सेवा गौतम बुद्धाइतकीच मोठी आणि परिणामकारक आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अहिंसेचे तत्त्वज्ञान विशद करणारे ‘सन्यस्त खडग्’ सारखं नाटक जरी लिहिलं असलं, तरी त्यांच्या मनात तथागत गौतम बुद्धांविषयी मनापासून आदर होता; हे त्यांच्या पुढील कथनावरून स्पष्ट होते. ‘स्वयम बौद्ध धर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्तांच्या मनात बौद्ध संघाविषयी जो आदर आणि जे प्रेम असेल, तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणारा बौद्ध धर्माचा मी एक नम्र चाहता आहे. बौद्ध धर्माची दीक्षा मी घेतली नाही त्याचे कारण हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे, तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय. ‘एके ठिकाणी सावरकर म्हणतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे खरे महापुरुष होते.

महात्मा गांधी सावरकर आणि आंबेडकर यांच्या सामाजिक भूमिकांमध्ये काही विशिष्ट अंतर असले तरी आज समाजामध्ये जेवढी तीव्र टोकाची मते आणि परस्पर द्वेष दिसतो, तेवढी तीव्र टोकाचा विरोध या तीनही नेत्यांचा एकमेकांमध्ये नव्हता. उलट वैचारिक विरोध पण सामाजिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी आग्रही भूमिका आणि एकमेकांविषयी नितांत आदर हा समान धागा या तीनही महापुरुषांच्या जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक होता.

Gandhi, savarkar and Ambedkar; their thoughts on hindu social reforms

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात