भारतात मुस्लिमांवर अत्याचार नव्हे, तर त्यांची लोकसंख्या वाढतेय; निर्मला सीतारामन यांनी सुनावले वॉशिंग्टन मध्ये!!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन डीसी : राहुल गांधींनी लंडनमध्ये जाऊन भारतात लोकशाही नसल्याचा धोशा लावला होता. त्यातून तयार झालेल्या “निगेटिव्ह परसेप्शन”ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी परखड शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या बैठकीसाठी निर्मला सीतारामन अमेरिकेतील वॉशिंग्टन मध्ये आहेत. तेथे पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ऍडम एस. पोसेन यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी भारताविषयीचे सगळे “निगेटिव्ह परसेप्शन” खोडून काढले. भारतात अल्पसंख्याकांवर विशेषतः मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत हा मुद्दा पीटरसन यांनी उपस्थित केल्याबरोबर निर्मला सीतारामन उत्तरल्या, की भारत हा जगातला दुसऱ्या नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. पाकिस्तान पेक्षा भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर भारतात मुस्लिम समुदाय एकमेव असा आहे की ज्यांची लोकसंख्या वाढत आहे. बाकीच्या समुदायांची लोकसंख्या स्थिर आहे. भारतात मुस्लिमांवर अत्याचार होत असते तर मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याचा परिणाम दिसला असता का??, असा परखड सवाल निर्मला सीतारामन यांनी केला आहे. भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत ते त्यांचे व्यवसाय करत आहेत त्यांच्याशी कोणताही भेदभाव केला जात नाही मुस्लिमांच्या मुला मुलींना शिक्षण सामाजिक क्षेत्रात फेलोशिप प्रदान केल्या जात आहेत, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधले.Muslims in India doing much better”: Sitharaman on negative Western ‘perception’



भारत – पाकिस्तान तुलना

त्याचवेळी निर्मला सीतारामन यांनी एका दाहक वास्तवाकडे पीटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मधील श्रोत्यांचे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, की 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पाकिस्तानची निर्मिती झाली. पण भारतात त्यावेळी अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिमांची जनसंख्या वाढत आहे. पण पाकिस्तान मध्ये मात्र सर्व अल्पसंख्यांक समाजाची लोकसंख्या कमालीची घटली आहे. तेथे कोणत्याच समुदायाचे अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. भारताविषयी विशिष्ट मानसिकतेतून काही लोक “निगेटिव्ह परसेप्शन” तयार करत असले तरी जे भारतात येत नाहीत त्यांनी भारतात येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मग तिचे विश्लेषण करावे, असे खडे बोल निर्मला सीतारामन यांनी सुनावले आहेत.

राहुल गांधींनी लंडनमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये भाषणे करून भारतात लोकशाही नसल्याचा धोशा लावला होता. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अमेरिकेत जाऊन भारतातल्या परिस्थिती विषयी भाष्य केले आहे. राहुल गांधींच्या लंडन दौऱ्यानंतर केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या नेत्या म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले भाष्य महत्त्वाचे आहे.

Muslims in India doing much better”: Sitharaman on negative Western ‘perception’

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात