नेदरलँड्सच्या शालेय अभ्यासक्रमात PAK च्या माजी राष्ट्रपतींवर धडा, मिस्टर 10 पर्सेंट झरदारींच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकणार विद्यार्थी

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : डच शाळेतील विद्यार्थी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराबद्दल शिकत आहेत. त्यांच्या शालेय पुस्तकातील एक संपूर्ण प्रकरण पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या पतीबद्दल आहे. नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना भ्रष्टाचाराचे दुष्कृत्य समजावे यासाठी अभ्यासक्रमात झरदारींवर एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे.Lesson on Ex-PAK President in Netherlands School Curriculum, Students to Learn About Mr. 10 Percent Zardari’s Corruption

आसिफ अली झरदारी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) सह-अध्यक्ष आहेत. 2008 ते 2013 पर्यंत ते राष्ट्रपती होते. त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो झरदारी हे सध्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत.



बेनझीर यांच्या राजवटीत कमिशन घ्यायचे झरदारी

पाकिस्तानातील ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने झरदारींबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात नेदरलँडमधील शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या धड्याचा फोटोही आहे, ज्यामध्ये झरदारींच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख आहे.

झरदारी यांच्या पत्नी बेनझीर या दोन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. पहिल्यांदा 1988 ते 1990 आणि दुसऱ्यांदा 1993 ते 1996 या काळात त्या पीएम होत्या. त्यावेळी झरदारींनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे बोलले जाते. परिस्थिती अशी आहे की, आसिफ अली झरदारी यांचे विरोधक त्यांना मिस्टर 10% म्हणतात.

झरदारी प्रत्येक सरकारी करारात किंवा इतर बाबींमध्ये 10 टक्के कमिशन घेत असत, असा आरोप आहे. या कारणास्तव त्यांना मिस्टर 10% हे नाव मिळाले. पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची 27 डिसेंबर 2007 रोजी संध्याकाळी हत्या करण्यात आली होती.

धड्यातून विद्यार्थी शिकणार भ्रष्टाचार वाईट

झरदारींवरील धड्याचे शीर्षकही अप्रतिम आहे. फॉर्मर पाकिस्तानी प्रेसिडेंट, मिस्टर 10 पर्सेंट, अरेस्टेड फॉर करप्शन या शीर्षकाखाली झरदारींचा फोटोही आहे.

जिओ न्यूजने या प्रकरणाबाबत नेदरलँडच्या शिक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला, जेणेकरून याबाबतची माहिती स्पष्ट होऊ शकेल. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमात झरदारी यांच्या भ्रष्टाचाराबाबत एक संपूर्ण प्रकरण आहे. 16 वर्षांपर्यंतच्या मुलांना याबद्दल सांगितले जाते. इतकंच नाही तर मुलं झरदारींच्या भ्रष्टाचार विषयावर ग्रुप डिस्कशनही करतात.

दुसरा अधिकारी म्हणाला – हा जुन्या पुस्तकातील धडा आहे. हा विषय आम्ही एका ऑथेंटिक न्यूज आर्टिकलमधून घेतला आहे. हे प्रकरण समाजशास्त्राच्या पुस्तकात ठेवण्यात आले आहे. ही प्रकाशकांची मर्जी आहे, सरकारला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मात्र, कोणत्या पुस्तकात कोणते विषय ठेवले आहेत, याची माहिती ते सरकारला आधीच देतात. त्यात काही अपडेट असेल तर तेही केले जाते.

प्रकरणानुसार- झरदारी आणि त्यांच्या बहिणीला भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात जावे लागले. हा खटला अजूनही सुरू आहे.

नवाझ यांचाही उल्लेख

विशेष म्हणजे, या धड्यातील फोकस 10% असिफ अली झरदारी यांच्यावर असला तरी त्यात नवाझ शरीफ यांचाही उल्लेख आहे. ते तीन वेळा वजीर-ए-आझम म्हणजेच पंतप्रधान राहिले आहेत. सध्या ते कायद्याच्या नजरेत फरार असून तीन वर्षांपासून लंडनमध्ये राहत आहेत. त्यांचे धाकटे भाऊ शाहबाज शरीफ हे सध्या पंतप्रधान आहेत.

Lesson on Ex-PAK President in Netherlands School Curriculum, Students to Learn About Mr. 10 Percent Zardari’s Corruption

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात