खळबळजनक! सांगलीतील जतमध्ये भरदिवसा भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

Vijay Tad

गोळ्या झाडून ठार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात दगडी घातला!

प्रतिनिधी

सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याती आज एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. भाजपा नगरसेवक विजय ताड यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी डोक्यात दगडही घातला. ही खळबळजनक घटना सांगोला रोडवरील अल्फोंसो स्कूलजवळ घडली आहे. BJP corporator shot dead in Jat in Sangli

विजय ताड हे त्यांच्या इनोव्हा गाडीतून मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघाले होते, दरम्यान पाठलाग हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून हल्ला चढवत ताड यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये विजय ताड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.


पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी! राज्यात तीन ठिकाणी ‘ED’ची छापेमारी


या घटनेची माहिती मिळताच ताड समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे.  तर, जत पोलिसांनीही घटनास्थळी तातडीने धाव घेतली आहे. परिसराता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.  हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून आणि कोण्ही केला आहे हे मात्र समजू शकले नाही

BJP corporator shot dead in Jat in Sangli

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात