पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी! राज्यात तीन ठिकाणी ‘ED’ची छापेमारी

ED

या गैरव्यहारात काही मोठे नेते सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे

प्रतिनिधी

पुणे : पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून आता राज्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि अहमदनगर जवळील अकोले या तीन ठिकाणी सकाळपासून छापेमारी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे दिसत आहे. शिवाय, या प्रकरणात अनेक मातब्बरांचाही समावेश असण्याची दाट शक्यता आहे. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागली असल्याच माहिती मिळत आहे, त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. Pradhan Mantri Awas Yojana Fraud case is big ED raids at three places in the state

महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून टेंडर भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासून संभाजीनगरात ईडीने नऊ ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.  तर या गैरव्यहारात काही मोठे नेते सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरात संबंधित कंत्राटदाराचं घर, एक रुग्णालय अशा एकूण नऊ ठिकाणी ही छापेमारी झाली आहे.  विशेष म्हणजे या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


Nizamabad case : NIAने दाखल केले दुसरे आरोपपत्र; PFIने मुस्लीम तरुणांना भडकवत दिले शस्त्र प्रशिक्षण!


पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याची कागदपत्रे संक्तवसुली संचालनालयाने दोन आठवड्यांपूर्वी ताब्यात घेतली होती. महापालिकेने राबवलेल्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. ४० हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार आहे.

पुण्यात चार ठिकाणी छापेमारी सुरू –

दुसरीकडे पुण्यातही चार ठिकाणी या प्रकरणी सकाळापासून ईडी कडून छापेमारी केली जात आहे. ईडीची छापेमारीत विविध कागदपत्रे हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात न्याती बिल्डर्सचे प्रमोटर्स कोलते पाटील आणि त्यांचे भागीदार शेंडे यांच्या येरवडा, मंहमदवाडी मधील कार्यालयात ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी  पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. हे. पुण्यातही छापेमारी करण्यात आल्याने  बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदरांचे धाबे दणाणले आहेत.

ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी –

सुमारे साडेचार हजार कोटी रुपये  खर्चून आर्थिक दुर्बल घटकांसाठी सात ठिकाणी तब्बल ३९ हजार ७६० सदनिका बांधण्यात येणार  होत्या. मात्र या कामाचे सर्व नियम मोडून, नव्याने निविदा पक्रिया न राबवता केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी केल्याची आणि त्यात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री व गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशी केली. त्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.  याबाबत ईडीकडे तक्रार दिल्यानंतर  ईडीने  या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती.

Pradhan Mantri Awas Yojana Fraud case is big ED raids at three places in the state

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात