PM मोदींच्या वेबसाइटवर आईच्या नावे सेक्शन : हिरांबाच्या आठवणी डिजिटली केल्या जतन, म्हणाले- आई तुला भेटण्याचा हा नवा सेतू!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या मातोश्री हिराबा मोदी यांना समर्पित एक सेक्शन तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिराबा यांच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी, त्यांचे फोटो-व्हिडिओ आणि त्यांची शिकवण यांचा समावेश करण्यात आला आहे.Mother’s name section on PM Modi’s website Hiramba’s memories digitally saved, said – This is a new bridge to meet you mother!

त्याचबरोबर यामध्ये चार स्वतंत्र सेक्शनही करण्यात आले आहेत. यामध्ये हिराबा यांचे सार्वजनिक जीवन, देशाच्या आठवणीतील हिराबा, हिराबा यांच्या निधनावर जागतिक नेत्यांचे शोकसंदेश आणि मातृत्व साजरे करण्याचे टेम्प्लेट देण्यात आले आहे. हिराबा यांचे गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही मायक्रोसाइट सुरू करण्यात आली आहे.

‘मी आणि आई’ नावाने व्हिडिओ

यात सुरुवातीला एक व्हिडिओ आहे. ज्यामध्ये पीएम मोदींनी त्यांच्या आईसाठी असेल हृदयातील शब्द सुंदरपणे मांडले आहेत. या व्हिडिओमध्ये पीएम मोदींच्या बालपणापासून ते त्यांच्या आईच्या मृत्यूपर्यंतचा काळ एका कथेच्या स्वरूपात दाखवण्यात आला आहे.



व्हिडिओच्या शेवटी पीएम मोदींच्या शब्दांना आवाज देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे- ‘आदरणीय आई, आज तू नाहीस, तरीही तू दिलेले संस्कार माझ्या मन आणि मेंदूवर तुझ्या दोन हातांसारखे पसरलेले आहेत, जे मला शक्ती आणि शिक्षण देतात. नतमस्तक होणे, कपाळावर टिळा लावणे, मिठाई खाऊ घालणे, हात धरणे, दिवा लावणे, चरणस्पर्श आणि बोटांच्या टोकातून माझ्या नसापर्यंत पोहोचणारी तुझी उर्जा, या काही आठवणी आता माझ्या आणि तुझ्यामध्ये एक नवीन सेतू आहेत. आई, तुला भेटण्यासाठी हा एक नवीन सेतू आहे. आता मी यावर चालणार आहे. आयुष्यात जेव्हा कधी संघर्ष किंवा आनंद असेल, भविष्यात मी जिथे असेन, तिथे तुझी नेहमीच उणीव असेल.’

4 सब-सेक्शन

या मायक्रोसाइटमध्ये चार विभाग तयार करण्यात आले आहेत. यापैकी पहिले लाइफ इन पब्लिक डोमेन आहे, ज्यामध्ये हिराबा यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित फोटो-व्हिडिओ, त्यांच्या गोष्टी आणि त्यांच्याशी संबंधित कलाकृतींचा समावेश आहे. नेशन रिमेम्बर्स या दुसऱ्या विभागात त्यांच्या निधनाचे दूरदर्शन कव्हरेज, प्रिंट आणि डिजिटल कव्हरेज, ट्विटर आणि नमो अॅपवरील शोक संदेश आणि श्रद्धांजली यांचा समावेश आहे.

तिसरा विभाग, वर्ल्ड लीडर्स कंडोलेन्स, हिराबा यांच्या निधनाबद्दल जागतिक नेत्यांच्या शोकसंदेशांचा समावेश आहे. शेवटचा विभाग Celebrate Motherhood आहे, ज्यामध्ये PM मोदी आणि त्यांच्या आईच्या छायाचित्रांसह चार टेम्पलेट्स दिले आहेत. लोकांना यापैकी एक छायाचित्र निवडून त्यावर त्यांचा संदेश पोस्ट करण्याचा पर्याय असेल, जो या वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल.

Mother’s name section on PM Modi’s website Hiramba’s memories digitally saved, said – This is a new bridge to meet you mother!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात