प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत आणि किरकोळ व्यापाऱ्यापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही मिळाले आहे. पण त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सन्मान वाढवणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव, राजस्थानच्या सहप्रभारी आणि छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर विजया रहाटकर यांनी वर्णन केले आहे. Union Budget 2023: Uplifting the dignity of women is the best feature of the budget
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत महिला सन्मान बचत पत्र जारी करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या अंतर्गत दोन लाख रुपये महिला किंवा मुलीच्या नावावर दोन वर्षांसाठी जमा करता येतील. 𝟕.𝟕𝟓 % व्याज सरकार देणार आहे. महिलांचे आर्थिक क्षमता त्याच्यामुळे वाढणार आहे महिला बचत गटांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी तरतूद करण्यात आली आहे, याकडे विजय रहाटकर यांनी विशेषत्वाने लक्ष घेतले आहे.
अर्थसंकल्पाबाबत आपले निरीक्षण नोंदवताना विजया रहाटकर म्हणतात :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App