विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची देशभरात वेगवेगळी चर्चा असताना काँग्रेसमध्ये नव नेतृत्वाचे वेगळे मंथन सुरू झाले आहे. 80 वर्षांच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे जरी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा गांधी परिवाराने सोपवली असली तरी काँग्रेसच्या प्रत्यक्ष प्रचाराची किंबहुना रणनीती ठरवण्याची प्रत्यक्ष जबाबदारी गांधी परिवारातील बहिण भावाकडेच आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसची 2024 पर्यंतचे रणनीती ठरविताना राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहणार आहे. Rahul and Priyanka Gandhi brother – sister duo to divide the labour and to rule the Congress in 2024
पक्षातल्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या संकेतानुसार, भारत जोडो यात्रेत नंतर काँग्रेस प्रत्येक राज्यांमध्ये छोट्या-मोठ्या यात्रा काढणार आहे आणि भारत जोडो यात्रेचा परिणाम तळागाळापर्यंत विस्तारणार आहे. या रणनीतीचा एक भाग म्हणून राहुल गांधी राहुल गांधी यांच्याकडे दक्षिणेतील राज्ये, तर प्रियंका गांधी वाड्रा यांच्याकडे उत्तरेकडीर राज्ये सोपविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
2024 मध्ये प्रियांका गांधी वाड्रा या रायबरेलीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचीही बातमी आहे. सोनिया गांधी या सध्या रायबरेलीच्या खासदार आहेत. परंतु, 2024 मध्ये त्या लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत, तर त्यांच्या ऐवजी प्रियांका गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवतील आणि राहुल गांधी हे आपला वायनाड मतदारसंघ राखून दक्षिणेत काँग्रेसचा गड मजबूत करतील, असे पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
याचा अर्थ 80 वर्षाच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे जरी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे असली तरी काँग्रेसच्या सर्व राजकीय निर्णय प्रक्रियेची आणि रणनीतीचे सूत्रे मात्र राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा या बहीण – भावंडांकडेच राहतील हे स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App