वृत्तसंस्था
नवी दिल्ली : 2014 नंतर भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित झाल्याची आवई उठविणाऱ्या लिबरल्सला एका आंतरराष्ट्रीय अहवालातून जोरदार चपराक बसली आहे. कारण अल्पसंख्याकांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश असल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top.
हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात अल्पसंख्याकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानात महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत आता एका जागतिक अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले असून, भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देश असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
Spoke at launch of ‘Global Minority Report’ by @cpaindia_org_in .India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top. Great work by @durganjha .Launched by former V. President @MVenkaiahNaidu , Swami Chidanand ji,Ram Bahadur Rai ji & me. pic.twitter.com/vdUxrCaj1z — Uday Mahurkar (@UdayMahurkar) November 30, 2022
Spoke at launch of ‘Global Minority Report’ by @cpaindia_org_in .India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top. Great work by @durganjha .Launched by former V. President @MVenkaiahNaidu , Swami Chidanand ji,Ram Bahadur Rai ji & me. pic.twitter.com/vdUxrCaj1z
— Uday Mahurkar (@UdayMahurkar) November 30, 2022
भारताला अग्रस्थान
इतर कोणत्याही देशांपेक्षा भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देश असून, भारतात अल्पसंख्याकांवर कोणतीही बंधने लादण्यात येत नाहीत, असे “सेंटर फॉर पॉलिसी ॲनालिसिस” या संशोधन संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. या संस्थेने अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांशी संबंधित एक अहवाल तयार केला असून, या अहवालात भारताला अग्रस्थान देण्यात आले आहे.
काय सांगतो अहवाल?
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App