प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी हॉस्पिटल मधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांना बायोमेट्रिक हजेरीनुसार वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय आरोग्य विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हा निर्णय घेतल्याने डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला. Tukaram Mundhe, who made biometric attendance to medical officers transfer
मात्र, हा आदेश काढल्यानंतर आज 29 नोव्हेंबर 2022 रोजी तुकाराम मुंढे यांचा बदलीचा आदेश शासनाने काढला आहे. त्यांना आरोग्य कुटुंब कल्याण आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त पदावरून मुक्त करण्यात कार्यमुक्त करण्यात आले असून आपल्या पदाचा कार्यभार आरोग्य विभागातील योग्य अधिकाऱ्याकडे आरोग्य सचिवांच्या सल्ल्यानुसार सोपवावा आणि पुढच्या आदेशाची वाट बघावी, असे आदेश शासनाने काढले आहेत.
आरोग्य आयुक्त पदावर असताना तुकाराम मुंढे यांनी सरकारी डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बायोमेट्रिक हजेरीच्या नुसारच त्यांना वेतन आणि भत्ते देण्याचा निर्णय घेतला होता.
शासकीय रुग्णालयांत नेमणूक झालेले डॉक्टर खासगी रुग्णालयात देखील सेवा देत असतात. त्यामुळे हे करत असताना शासकीय रुग्णालयांत उशिरा येणे किंवा सुट्टी घेऊन हजेरी पटावर हजर असल्याचा शेरा मारणे असे प्रकार करण्यात येतात. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बायोमेट्रिक हजेरीनुसार, डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वेतन आणि भत्ते देण्याचा फतवा काढला होता.
त्याचप्रमाणे शासकीय सेवेत कार्यरत असणा-या आपल्या कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची नावे, खासगी रुग्णालयांची नोंद, अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांची तपशीलवार माहितीसह यादी सादर करावी, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले होते. ही पद्धत अंमलात न आणल्यास अशा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यामुळे दांडीबहाद्दर आणि बेजबाबदार अधिकारी आणि डॉक्टरांना चांगलाच चाप बसला. पण आज 29 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाने तुकाराम मुंढे यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयुक्त पदावरून कार्यमुक्त करून पुढील आदेश येईपर्यंत नव्या नियुक्तीची वाट पाहण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App