प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळवण्यावर ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात राजकीय चुरस लागली असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचा मेळावा आता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मैदानावर अर्थात बीकेसीच्या मैदानावर होणार आहे.
शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी एमएमआरडीएने दिल्याचे समोर आले आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानावर सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने केलेला अर्ज एमएमआरडीएने फेटाळला आहे. यामुळे शिंदेंचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंचा मेळावा नेमका कुठे होणार?, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याचा निर्धार उद्धव ठाकरे यांनी परवाच व्यक्त केला आहे. पण त्यांना परवानगी मिळणार का?, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात दसरा घेण्याची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने एमएमआरडीएकडे अर्ज केला होता. हा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी ज्या मैदानाची परवानगी मागितली होती मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी शिंदे गटाने, तर दुसऱ्या मैदानासाठी शिवसेनेने अर्ज केला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून कऱण्यात अर्ज आणि त्यामध्ये नमूद केलेले मैदान हे एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळून लावला आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील शिवाजी पार्कवरच शिवसेनेचा दसरा मेळावा घेतला जातो. मात्र शिंदे गटानेही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी बीकेसी येथील एका मैदानासाठी देखील एमएमआरडीएकडे अर्ज केला होता. यावर एमएमआरडीएने परवानगी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App