वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा मिळालेला नाही. ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने किरकोळ महागाई पुन्हा 7 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 6.71 टक्के होता. यापूर्वी, किरकोळ महागाई जूनमध्ये 7.01 टक्के, मे 2022 मध्ये 7.04 टक्के आणि एप्रिलमध्ये 7.79 टक्के होती, जो गेल्या अनेक महिन्यांतील सर्वोच्च पातळीत होती.No Respite from Inflation Retail Inflation Rate 7 Percent in August 2022
भाज्या महागल्या
ऑगस्ट महिन्यात पुन्हा एकदा अन्नधान्य महागाई वाढली आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर जुलैमध्ये 6.75 टक्के आणि जूनमध्ये 7.75 टक्क्यांच्या तुलनेत 7.62 टक्के राहिला. भाजीपाला महागाई दर 13.23 टक्क्यांनी वाढला आहे.
शहरी-ग्रामीण भागात अन्नधान्य महागाई
ऑगस्ट महिन्यात शहरी आणि ग्रामीण भागात अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाली आहे. शहरी भागातील अन्नधान्य महागाई जुलैमध्ये 6.69 टक्क्यांवरून 7.55 टक्के राहिली. तर ऑगस्ट 2021 मध्ये शहरी भागात 3.28 टक्के खाद्यान्न महागाई होती. त्याच वेळी, ग्रामीण भागात अन्नधान्य महागाई दर 7.60 टक्के आहे, जो जुलैमध्ये 6.73 टक्के होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ग्रामीण भागात अन्नधान्य महागाईचा दर 3.08 टक्के होता.
EMI महाग होईल का!
किरकोळ चलनवाढीचा आकडा अजूनही RBI च्या सहिष्णुता बँडच्या 6 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. आणि 30 सप्टेंबर रोजी आरबीआय व्याजदरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करेल. असे मानले जात आहे की आरबीआय पुन्हा रेपो दर एक चतुर्थांश टक्क्यांनी वाढवू शकते. रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.65 टक्के केला जाऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App