वृत्तसंस्था
मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात आधीच जेलमध्ये असलेले संजय राऊत यांचे निकटवर्ती समजले जाणारे सुजित पाटकर यांच्यावर लाईफलाईन हाॅस्पिटल घोटाळ्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर 38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार त्यावेळी अस्तित्वात असल्याने पोलीस सुजित पाटकर यांच्यावर कारवाई करत नव्हते, अशी तक्रार किरीट सोमय्या यांनी केली आहे.A case of fraud of 38 crores has been filed against Sujit Patkar, a close associate of Sanjay Raut
संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर यांच्यासह लाईफलाईन हाॅस्पिटल मॅनेजमेंटचे भागीदार डाॅक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्यावरही 38 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांचे मित्रही आता कारवाईच्या रडारवर असल्याचे, दिसून येत आहे.
सुजित पाटकर हे राऊतांचे व्यावसायिक मित्र
लाईफलाईन हाॅस्पिटलमध्ये 38 कोटींचा घोटाळा झाल्याची तक्रार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र आणि त्याचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांवर आझाद मैदान पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयामध्ये 38 कोटींचा घोटाळा असल्यामुळे आता याबाबत संबंधित यंत्रणा तपास करण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App