Boycott Bollywood : बॉलिवूडचा प्रवास; अतिग्लॅमरस हॉलिवूड होण्याची महत्त्वाकांक्षा ते आता रोजगाराचे गळे काढायची वेळ!!


“बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड मुळे बाकी काय झाले असेल ते असेल किंवा भविष्यात काय व्हायचे ते होवो… पण बॉलिवूडचा प्रवास मात्र अतिग्लॅमरस हॉलिवुड होण्याच्या महत्त्वाकांक्षेपासून ते आता सर्वसामान्यांचा रोजगार वाचवण्याचे गळे काढायच्या रडगाण्यापर्यंत येऊन ठेपला आहे. बॉलिवूडचे “हिंदू फोबिक” 3 खान, करण जोहर, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर आणि बॉलिवूडकर सध्या रोजगाराची दुहाई देताना दिसत आहेत!!Boycott Bollywood trends makes good results, as Bollywood now speaks of employment than Hollywood glamour

लालसिंग चढ्ढा बहिष्कार

आमिर खानच्या लालसिंग चढ्ढा सिनेमाच्या बॉयकट नंतर बॉलिवूड सिनेमांवर बॉयकॉटचा अर्थात बहिष्काराचा मोठा ट्रेंड आला. सुरुवातीला बॉलिवूड मधल्या करीना कपूर, आलिया भट यांच्यासारख्या अभिनेत्रींनी या ट्रेंडची खिल्ली उडवली. तापसी पन्नू हिच्यासारखी अनुराग कश्यपची “लाडकी” अभिनेत्री मलाही “बॉयकॉट” करा, असे म्हणू लागली. पण अनुराग कश्यप आणि तिच्या 30 कोटींच्या फिल्मने जेव्हा फक्त 3 कोटींच्या धंदा करून ती पडद्यावरून गुंडाळली गेली, तेव्हा मात्र अनेकांना “जाग” आली किंबहुना बॉलिवूडची मस्ती उतरायला सुरुवात झाली आणि अनुराग कश्यप याच्यासारखे दिग्दर्शक बॉलिवूड मधल्या रोजगारावर बोलायला लागले!! त्याच्या या बोलण्याला स्वरा भास्कर सारखी अभिनेत्री पाठिंबा देऊ लागली!!अतिग्लॅमरस हॉलिवूडची महत्त्वाकांक्षा

प्रेक्षकांनी बॉलिवूडच्या सिनेमांकडे अशीच पाठ फिरवली, त्यावर बहिष्कार घातले तर बॉलिवूड मधला रोजगाराचे काय होईल??, असे गळे काढायला अनेकांनी सुरुवात केली आहे आणि नेमका हाच तो “अतिग्लॅमरस हॉलिवूड होण्याची महत्त्वाकांक्षा ते सर्वसामान्यांचा रोजगार” असा प्रवास आहे!! फार जुनी गोष्ट नाही. कोरोना लाटेच्या आधीची बॉलिवूडची कुठलीही अवॉर्ड फंक्शन बघा… ते रेड कार्पेट, मोठमोठे सेट निदान या दृष्टीने तरी हॉलिवूडच्या दिशेने चालले होते. बॉलिवूडचे सिनेमे कितीही रद्दड असोत, त्या सिनेमांमध्ये काम करणाऱ्या नटांच्या महत्त्वाकांक्षा हॉलिवुड मध्ये सिनेमात काम करण्याच्या होत्या. किंबहुना बॉलिवूड हे हॉलिवूडला टक्कर घेणारच आहे, असा आभास बॉलिवूडचे 3 खान निर्माण करत असत. त्यांना करण जोहर किंवा अन्य निर्मात्यांचे साथ मिळत असे!!

– सुशांत सिंग राजपूत कनेक्शन

पण “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड यशस्वी झाल्यानंतर स्वरा भास्करने तिच्या मनातली जी खंत बोलून दाखवली, त्यामध्ये जरूर सत्य आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला “व्हिलन” स्वरूपात रंगवले गेले. बॉलिवूड जणू ड्रग्स पार्ट्यांमध्ये रमले आहे, त्यात फक्त अंडरवर्ल्ड मधले गुन्हेगार पैसा खेळवतात असे चित्र रंगवले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून बॉलिवूडवर बहिष्कार अर्थात “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड सुरू झाला. आता त्याचा फटका सगळ्या सिनेमांना बसतो आहे. त्याचा दुष्परिणाम आता बॉलिवूड मधल्या रोजगारावर होतो आहे, असे स्वरा भास्करचे म्हणणे आहे. अर्थात हे यापूर्वी अनुराग कश्यपने बोलून झाले आहे. अनुराग कश्यपच्या त्या वक्तव्याला स्वरा भास्करने फक्त दुजोरा दिला आहे. पण त्यातूनच बॉलिवूड मधली नेमकी पोटदुखी उघड होत आहे. जे बॉलिवूडचे कलाकार स्वतःला “फार मोठे” समजू औधत्य दाखवत होते, थोडक्यात दादागिरी करत होते ते आता रोजगाराची भाषा बोलू लागलेत. याचा अर्थच “बॉयकॉट बॉलीवूड” ट्रेंड खऱ्या अर्थाने परिणामकारक ठरला आहे!!

 “हिंदू फोबिक” 3 खान

आणि स्वरा भास्कर म्हणते त्याप्रमाणे मूळातच बॉलिवूडचे चित्र “व्हिलन” स्वरूपात रंगवायलाच कशाला हवे? बॉलिवूडची आत्तापर्यंतची वाटचाल “व्हिलन” स्वरूपातच होती. तेथे अंडरवर्ल्डचा पैसाच मोठ्या प्रमाणावर गुंतवला जातो ही वस्तुस्थितीच आहे. सुशांत सिंग रजपुतच्या संशयास्पद मृत्यूच्या निमित्ताने फक्त ती बाहेर आली आहे. सर्वसामान्यांना समजली आहे आणि त्यातही 3 खानांचा हिंदू द्वेष्टा खरा चेहरा समोर आल्यानंतर “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड सुरू झाला आहे. या 3 खानांच्या “हिंदू फोबिक” प्रवृत्तीतच स्वरा भास्कर वाढली. ती देखील स्वतः “हिंदू फोबिक” झाली. या कटू सत्याकडे मात्र स्वरा भास्करने दुर्लक्ष केले आहे आणि आता “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड थांबावा यासाठी बॉलिवूड मधल्या सर्वसामान्यांच्या रोजगाराची दुहाई देत आहे.

रोजगार फक्त बॉलिवूडमध्येच मिळतो??

पण रोजगार फक्त बॉलिवूड मध्येच मिळतो, असे दाखवण्याचा बॉलिवूडकरांचा प्रयत्न आहे. हा त्यांचा गैरसमज देखील आहे. तसा इतरांचा गैरसमज अजिबात नाही. “बॉयकॉट बॉलिवूड” अशा ट्रेंडचे प्रतिबिंब “बायकॉट टॉलिवूड” किंवा “बॉयकॉट मॉलिवूड” असे पडलेले नाही. याचा अर्थ प्रादेशिक सिनेमांना त्याचा फटका बसलेला नाही. बॉलिवूडची खरी पोटदुखी ही आहे. दक्षिणेतला सिनेमा आपल्यापुढे जातो आहे. आपल्या कमाईवर हजारो कोटी रुपयांनी मात करत आहे, ही ती पोटदुखी आहे आणि त्यातच खऱ्या अर्थाने “हिंदू फोबिक” 3 खानांच्या विद्रूप चेहरा समोर आल्यानंतर “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड सुरू झाल्याने बॉलिवूडला जो फटका बसतो आहे त्यातून ही पोटदुखी पोटशुळापर्यंत वाढली आहे. म्हणूनच आता “बुडत्या बॉलिवूडला” सर्वसामान्यांच्या रोजगाराची दुहाई देण्याच्या “काडीचा आधार” घ्यावा लागत आहे!! ही बॉलीवूडचे 3 खान, करण जोहर, अनुराग कश्यप आणि स्वरा भास्कर हे कितीही नाकारत असले तरी दारुण वस्तुस्थिती आहे

Boycott Bollywood trends makes good results, as Bollywood now speaks of employment than Hollywood glamour

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*