वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा घोटाळ्यात सीबीआयने आज शुक्रवारी 30 ठिकाणी छापे घातले. या प्रकरणी आतापर्यंत 33 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी नोंदी शोधत आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी सीबीआयने अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. CBI Raids: Raids in 30 places in Jammu and Kashmir, crimes against 33 people
मात्र, दरम्यानच्या काळात माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, फारुक अब्दुल्ला आणि गुपकार नेत्यांना स्थानबद्धतेची अफवा पसरली होती. पण तसे काही घडलेले नाही. या संबंधी अफवेचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे.
जम्मू – काश्मीर पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी अखनूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घातल्या. सीबीआयने अखनूरच्या लायब्ररीवरही छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे गोळा केल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने आतापर्यंत घातलेल्या छाप्यांवर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी 1200 पदांसाठी आयोजित जम्मू – काश्मीर पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती परीक्षा यापूर्वीच रद्द केली आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. अशा परिस्थितीत आता या 1200 पदांची नव्या पद्धतीने भरती होणार आहे.
जम्मू-काश्मीर पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने यासंदर्भातील अहवाल उपराज्यपालांना सादर केल्यानंतर सर्व भरती रद्द करण्याचे सांगितले होते. गृहसचिव आर. के. गोयल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 6 जुलै रोजी उपराज्यपालांना अहवाल सादर केला होता. मोठी फसवणूक झाल्याचे या तपासातून समोर आले. यापूर्वी देखील पेपर फुटल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App