प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शाखाप्रमुखांपासून ते आमदरांनी आता शिंदे गटाचा मार्ग निवडला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार सुद्धा नाराज असल्याचे समोर आहे. हे 12 खासदार शिंदे गटात सामील होतील, असा दावाचा भाजपचे खासदार रामदास तडस यांनी केली आहे. याचे परिणाम राष्ट्रपती निवडणुकीत ठळकपणे दिसतील, अशी शक्यता शिवसेनेचे सूत्रांनी वर्तवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक आहेत या बैठकीत काही ठोस निर्णय झाला तरच शिवसेनेच्या खासदारांचे बंड रोखले जाण्याची शक्यता आहे.12 Shiv Sena MPs preparing for mutiny; Results to be seen in the presidential election ??
शिवसेना सध्या मोठ्या बंडाळीने ग्रस्त झाली आहे. एकापाठोपाठ आमदार, नगरसेवक शिवसेना सोडून शिंदे गटात सामील होत आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमध्ये खासदारांचे दबाव तंत्र सुरू आहे. शिवसेनेच्या खासदारांनी उघडपणे एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी राहुल शेवाळे, भावना गवळी या खासदारांनी केली आहेच. अशातच भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शिवसेनेचे 12 खासदार नाराज असल्याचा दावा केला आहे.
शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणार आहेत. शिवसेना खासदारांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. विकासासाठी जनतेने निवडून दिले मात्र विकास न झाल्याने नाराज आहे, असा दावाचा तडस यांनी केला आहे.
विकासच्या दृष्टीने लोकांनी खासदारांना निवडून दिले आहे. जर विकासच झाला नाही तर नाराजी राहते. त्यामुळे विकासच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी, हिंदुत्व टिकवण्यासाठी 12 खासदार हे शिंदे गटामध्ये येणार आहे, असेही तडस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App