वृत्तसंस्था
मुंबई : शनिवारी संपूर्ण देशात मान्सूनचा विस्तार झाला. जुलै महिन्यात देशात सरासरीएवढा तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक (45 टक्के) पावसाचा अंदाज आहे. 6 जुलैपासून राज्यात दमदार पाऊस होण्याचे भाकीत वेधशाळेने वर्तवले आहे.Weather Alert Heavy rains in the state from July 6, three days of moderate rains in Marathwada
मराठवाड्यात 3, 4 व 5 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.
मराठवाड्यात 3 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस
मराठवाड्यात 3, 4 व 5 जुलै रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. पुढील 4 ते 5 दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. 3 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात, 4 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट होईल.
5 जुलै रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात 8 ते 14 जुलैदरम्यान, पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App