प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकार जाऊन शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर होणाऱ्या विधानसभेतल्या शक्तिपरीक्षेत प्रथम उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. पण या निवडणुकीत पहिली लढाई शिवसेनेतल्या दोन गटांमधल्या व्हीप मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने राहुल नार्वेकर तर शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी दिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना, ही निवडणूक मीच जिंकणार, असा विश्वास शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे. Maharashtra assembly speaker Election : Shivsena issues whip, but will shinde faction obey it??
सर्व आमदार मला मतदान करतील
महाविकास आघाडीतील शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सर्व आमदार हे मला मतदान करतील आणि 160 मतांच्या पुढे मी जाईन, असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी राजन साळवी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?
अपात्र व्हायचं नसेल तर…
शिवसेना पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी आपल्या उमेदवाराला मत देण्यासाठी व्हिप जारी केला आहे. शिंदे गटातील आमदारांनाही हा व्हीप लागू होत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. बंडखोर आमदारांना जर आमदार म्हणून अपात्र व्हायचे नसेल तर त्यांना मतदान हे मलाच करावे लागेल, असेही राजन साळवी यांनी यावेळी म्हटले आहे.
शिवसेनेचा व्हीप जारी
विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजन साळवी आणि राहुल नार्वेकर यांच्यात रविवारी अध्यक्षपदासाठी चुरस रंगणार आहे. त्यामुळे आपले उमेदवार राजन साळवी यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी तसे आदेश दिले आहेत. पण एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप पाळणार का??, की आई निवडणुकीच्या वेळी ते सभा त्या करून बाहेर पडून भाजप आणि अपक्षांच्या मतांच्या बळावर राहुल नार्वेकर यांना निवडून आणणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विश्वास दर्शक ठरावाच्या आधी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App