प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीमध्ये 21 जूनला एका व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या झाली होती आता या हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एएनआयकडे सोपवण्यात आला आहे. या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एएनआयचे पथक अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये नुपूर शर्मा प्रकरणाशी काही संबंध आहे का?, याचा तपास एनआयए करणार आहे. ANI probe into Umesh Kolhe murder case
काय आहे प्रकरण?
अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनला रात्री हत्या झाली होती. कोल्हे यांच्यामागे वादग्रस्त नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? कारण उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने, त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशीची मागणी भाजप नेते आणि खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती.
धर्मांध लोकांच्या कारवाया चिंताजनक
नुपूर शर्मांचे समर्थन अमरावती शहरातील ज्या लोकांनी केले होते. त्यांना धमक्या येत होत्या. त्यामुळे शहरात संतापाची भावना निर्माण झाली. अशा परिस्थितीत कोल्हे यांची झालेली हत्या संशय निर्माण करत आहे. शहरात धर्मांध शक्तीच्या वाढलेल्या कारवाया, चिंताजनक आहेत. पुढे जाऊन परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे सुत्रधार कोण हे शोधणे आवश्यक असल्याचे, माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आता हा तपास एएनआयकडे देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App