प्रतिनिधी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातले ठाकरे सरकार गेल्यानंतर शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत पण तसाच एक जोराचा धक्का धीरे से पवारांना देखील बसला आहे!!Maharashtra wrestling organisation dismantled
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. शरद पवार या परिषदेचे अध्यक्ष होते. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय कुस्ती संघटनेची नवी दिल्लीत वार्षिक सर्वसाधारण बैठकीत झाली. या बैठकीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यासाठी निर्णय घेण्यात आला. हिरवी शरद पवारांचे निकटवर्ती मानल्या जाणाऱ्या ब्रजभूषण सिंह यांनी पवारांना हा धक्का दिल्याचे मानला जात आहे.
अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या सूचनांनुसार १५ आणि २३ वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली नाही. त्या विरोधात जिल्हा संघटना आणि काही पैलवानांनी केलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होणार आहे. हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह अन्य बाबींवर लक्ष देणार आहे.
राज्य कुस्तीगीर परिषदेकडून चांगला प्रतिसाद मिळत नव्हता : भारतीय कुस्ती संघटना
यावर भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते. याशिवाय राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. यात जिल्हा संघटना आणि खेळाडूंच्या तक्रारींचा समावेश आहे. आम्ही त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही दिला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली.
गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न : सर्जेराव शिंदे
या विषयावर राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला. तर राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी सांगितले की, काही गैरसमज झाले असतील. ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी भेटून या प्रकरणावर तोडगा काढू.
पवारांच्या ताब्यात 40 वर्षे संघटना
भाजपाचे खासदार ब्रजभूषण सिंग हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत, तर विनोद तोमर सचिव आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे शरद पवार हे अध्यक्ष, तर बाबासाहेब लांडगे हे ४० वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे शरद पवार यांचे राज्य कुस्तीगीर परिषदेवर वर्चस्व आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते. बाळासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपूर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलनदेखील केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App