राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संतप्त झालेल्या संजय राऊत यांनी 6 अपक्ष आमदारांची नावे घेऊन जोरदार तोफा डागल्या होत्या. शिवसेनेला शब्द देऊन 6 अपक्ष आमदारांनी गद्दारी केली, असा आरोप त्यांनी केला होता. संजय राऊत यांच्या आरोपांवर प्रत्येक आमदाराने प्रत्युत्तर दिले हे खरे. परंतु सर्वात जास्त संतप्त झाले ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर काढलेले आमदार देवेंद्र भुयार.Rajya Sabha elections: Raut’s allegations against 6 MLAs; But Devendra Bhuyar went to Pawar alone to give an explanation !!; What’s the secret
भुयार यांची निष्ठा पवारांवर
देवेंद्र भुयार यांनी उघडपणे आपली निष्ठा शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी असल्याचे जाहीर केले आणि ते आज शरद पवारांना भेटायला सिल्वर ओकवर गेले जाऊन आले. आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार मतदान केल्याची त्यांनी शरद पवारांना खात्री करून दिली. त्यानंतर शरद पवारांनी तुझ्या विषयी काही शंका नाही, असे आपल्याला सांगितल्याचे देवेंद्र भुयार नंतर पत्रकारांना म्हणाले. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. काही पत्रकारांच्या आणि नेत्यांच्या चर्चेमुळे संजय राऊत यांचा गैरसमज झाला आणि म्हणून त्यांनी आपले नाव घेतल्याचे देवेंद्र भुयार म्हणाले.
एकटे देवेंद्र भुयार का गेले?
पण मूळातला प्रश्न वेगळाच आहे. संजय राऊत यांनी 6 आमदारांची थेट नावे घेऊन दगाबाजी केल्याचा आरोप केला होता. यामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, राजेंद्र पाटील तसेच संजय मामा शिंदे, देवेंद्र भुयार आणि श्यामसुंदर शिंदे यांचा समावेश होता. या 6 आमदारांनी नंतर संजय राऊत यांच्याविरुद्ध संताप जरूर व्यक्त केला. परंतु या आमदारांपैकी फक्त देवेंद्र भुयार यांनीच “फार” मनाला लावून घेत आज शरद पवार यांची सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर ते संजय राऊत यांना भेटायला देखील गेले. शिवसेना आणि राष्ट्रवादीत संशय कल्लोळ नाट्य तयार झाल्यानंतर देवेंद्र भुयार यांनी पवार आणि राऊत यांची भेट घेणे म्हणजे नेमके काय आहे??, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकट्या देवेंद्र भुयार यांनाच एवढा राग का आला असावा??
वडेट्टीवारांवर भोयार यांची टीका
आधी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार तोफ डागणारे देवेंद्र भुयार नंतर फक्त काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर का घसरले?? माझा मतदारसंघ पाकिस्तानात नाही मी वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही. मतदारसंघासाठी मागतो, असे देवेंद्र भुयार यांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावले.
देवेंद्र भुयार यांच्या आजच्या राजकीय भेटीगाठींचा नेमका अर्थ काय आहे?? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी राज्यसभा निवडणुकीत आपल्या मतांचा कोटा वाढवून आपापल्या उमेदवारांना सेफ करून घेतले. एक प्रकारे शिवसेनेला धडा शिकवला. मग आता विधान परिषद निवडणुकीत पुढचा धडा काँग्रेसला शिकवण्याचे घाटत आहे काय?? पवार – भुयार, राऊत – भुयार यांची भेट याचेच सूचक आहे का?? याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शिवसेनेला दणका दिला, आता नंबर काँग्रेसचा??
राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या रात्री शरद पवारांनी राष्ट्रवादीचा कोटा वाढवून घेतला आणि शिवसेनेला दणका बसला. या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला असाच धडा मिळाल्यास कोणाच्या राजकीय भुवया उंचवायला नको अथवा आश्चर्य वाटायला नको!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App