प्रतिनिधी
नवी दिल्ली : ममता बॅनर्जी यांनी बैठक बोलावली विरोधकांनी पाठ फिरवली आणि त्याची गाडी अडखळली, अशी अवस्था दुसऱ्याच दिवशी येऊन ठेपली आहे. ममता बॅनर्जी यांचा 15 जून च्या बैठकीला उपस्थित राहण्याचे अद्याप एकाही नेत्याने कन्फर्मेशन दिलेले नाही.Mamata Banerjee called a meeting; Opponents turned their backs
राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपल्यावर आला आता देशात लागलीच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यावर लागलीच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील भाजपविरोधी सर्व पक्षांना दिल्लीत संयुक्त बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. पण या बैठकीला दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्ष एकेक करून खोडा घालताना दिसत आहेत. या बैठकीसाठी याकरता शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे या बैठकीला कोण उपस्थित राहणार याचे कन्फर्मेशन आलेले नाही. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सिताराम येचुरी देखील या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत.
काँग्रेसचीही त्याच दिवशी बैठक
१५ जून रोजी दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीला सीताराम येचुरी यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांचा उमेदवार कोण राहील? याबद्दल अंदाज बांधले जात आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आप नेते खासदार संजय सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. खर्गे विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. याचवेळी ममता यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपाविरोधी पक्षांच्या २२ नेत्यांना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची १५ जून रोजी होणारी बैठक आधीच ठरलेली आहे, असे येचुरी यांनी म्हटले आहे.
– शिवसेनेचे अयोध्या दौऱ्याचे कारण
ममता बॅनर्जी यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे. परंतू आम्ही तेव्हा अयोध्येमध्ये असणार आहोत. त्यामुळे या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आपण स्वतः उपस्थित राहू शकणार नाही. या बैठकीला आमचा एक ज्येष्ठ नेता पाठवू, असे राऊत म्हणाले आहेत. पण नेमका कोणता शिवसेना नेता त्या बैठकीला उपस्थित राहणार याचा खुलासा राऊत यांनी केलेला नाही. त्याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी ज्या 22 नेत्यांना पत्र पाठवले आहे, त्यांचे देखील बैठकीसाठी कन्फर्मेशन आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App