प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा 1 जादाचा खासदार निवडून आणण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने आपल्या आमदारांची सोय 5 स्टार हॉटेल ट्रायडेंट मध्ये केली आहे. काँग्रेस आणि भाजपने 5 स्टार हॉटेल्स बुक केली आहेत.Rajya Sabha Election: You are the one to calculate the 5 star balance of MLAs; Open your eyes, look at the bills, they will turn white after reading
सहाव्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना – भाजपा यांच्यात थेट लढत आहे. दोन्हीकडून विजयाचा दावा केला जात आहे. पण या निवडणुकीत घोडेबाजार टाळण्याच्या नावाखाली आमदारांना एकगठ्ठा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहे, तर भाजपा आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येईल.
काँग्रेसनेही त्यांच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्येच असणार आहे. राज्यसभेचा एक जादाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष आपल्या आमदारांच्या सरबराईसाठी ते 5 स्टार हाॅटेलच्या बिलांवर काही कोटी रूपये उडवणार आहेत.
– हे वाचा हॉटेलचे किती भाडे?
ट्रायडेंट हॉटेल एका दिवसाचे भाडे
सुप्रिअर रुम सिंगल : १८,५०० रुपये
डबल रुम : २० हजार रुपये
प्रिमिअम रुम सिंगल : २२ हजार रुपये
प्रिमिअम डबल रुम : २३ हजार ५०० रुपये
– प्रिमिअम ओशन व्ह्यू रूम
सिंगल रुम : २३ हजार ५०० रुपये
डबल रुम : २५ हजार रुपये
प्रेंसिडेंशिअल सूट : ३ लाख रुपये
– ताज हॉटेल एका दिवसाचे भाडे
लग्झरी रुम : २२ हजार रुपये
लग्झरी ग्रॅंड : २५ हजार रुपये
लग्झरी ग्रॅंड (Sea View) : २७ हजार ५०० रुपये
ताज क्लब रुम : ३२ हजार रुपये
ग्रॅंड लग्झरी रुम : १ लाख ६ हजार रुपये
याखेरीज खाण्या पिण्याची बिले अलग असणार आहेत. या भाड्याचा आणि अन्य हिशेब केला तर पुढील ३ दिवस हे आमदार हॉटेलमध्ये थांबले, तर एका आमदारांमागे काही लाख रुपये खर्च होणार आहेत. अशातच महाविकास आघाडीचे १४५, भाजपाचे ११५ आमदारांचा हॉटेल खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे लोकांनी निवडून दिलेल्या या आमदारांवर त्यांचे राजकीय पक्ष कोट्यवधी रुपये खर्च उडवत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App