प्रतिनिधी
मुंबई : अमरावतीच्या खासदार नववीत राणा आणि रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने सशर्त जामीन दिला होता. 12 दिवसांच्या कोठडीनंतर राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन मंजूर करताना न्यायालयाने 3 महत्त्वाच्या अटी घातल्या होत्या. त्यात प्रसारमाध्यमांशी न बोलण्याची अट घालण्यात आली होती. परंतु, नवनीत राणा यांनी माध्यामांना बाईट दिला. शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. Impact of Rana couple on bail Bite given when talking to the media
यानंतर शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लघंन केल्याचा आरोप केला. आता मुंबई पोलिस राणा दाम्पत्याच्या वक्तव्यांची तपासणी करणार आणि त्यात जर काही आक्षेपार्ह आढळले, तर मात्र राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात येऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App