ज्ञानवापी मशिद वाद : धर्मांध औरंगजेबाचे गुन्हे लपवण्याचे कारण नाही; मुख्तार अब्बास नक्वींची स्पष्टोक्ती!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काशीमधील ज्ञानवापी मशिदीच्या वादात आता केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी देखील मुस्लिम समुदायाला सुनावले आहे. ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचा कोर्टाने दिलेला फैसला मुस्लिम पक्षाने स्वीकारला पाहिजे. धर्मांध औरंगजेबाने केलेले गुन्हे लपवण्याचे काहीच कारण नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्तार अब्बास नक्वी यांनी केली आहे.
There is no reason to hide the crimes of bigoted Aurangzeb; Mukhtar Abbas Naqvi’s outspokenness

काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या परिसरात असलेली ज्ञानवापी मशिदीच्या तीन भिंती हिंदू स्ट्रक्चरच्या आहेत. वरती फक्त मशिदीसारखे घुमट बांधले आहेत. हे मूळ हिंदू मंदिर होते. नंतर त्याचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, असा दावा करत हिंदू पक्ष कोर्टात गेला आहे.कोर्टाने या दाव्यावर ज्ञानवापी मशिदीचे व्हिडीओग्राफी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी स्वतंत्र वकील कमिशनर नेमून ही व्हिडिओग्राफी सुरू देखील झाली होती. परंतु, मुस्लीम पक्षाने त्यावर आक्षेप घेतला होता.

आता या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशात मोठे धमासान सुरू असून अनेक मुस्लीम नेत्यांनी यात उडी घेतली आहे. 1990 च्या दशकात अयोध्येत जी परिस्थिती निर्माण केली होती तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा उत्तर प्रदेश भाजप सरकारचा डाव असल्याचा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे, तर ज्ञानवापी मशीद वादामध्ये न्यायालयाला फैसला करू द्या, असे प्रत्युत्तर मुख्तार अब्बास नकवी यांनी दिली आहे. न्यायालयाचे मत काय आहे??, न्यायालय कोणता आदेश देते??, या बाबी बाजूला ठेवल्या तरी औरंगजेबाचे धर्मांध औरंगजेबाचे गुन्हे लपवण्याचे काहीच कारण नाही. त्याने केलेल्या गुन्हेगारी कृत्यांचा आजही मुस्लिमांना त्रास होतो, हे विसरता कामा नये. न्यायालयाने ज्ञानवापी मशिदी संदर्भात जो निर्णय दिला आहे तो स्वीकारला पाहिजे. सत्य पुढे येऊ दिले पाहिजे, असे मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे.

ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर शृंगार गौरी, गणेश, हनुमान यांच्या प्रतिमा आहेत. याच संदर्भातले सर्वेक्षण तसेच ज्ञान व्यापी मशिदीच्या खाली असलेल्या तळघराचे सर्वेक्षण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र मुस्लिम समाजाचा या सर्वेक्षणाला विरोध आहे. त्यामुळे मुख्तार अब्बास नकवी यांनी सर्वेक्षण पूर्ण होऊन त्यातले सत्य बाहेर येऊ द्यावे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

There is no reason to hide the crimes of bigoted Aurangzeb; Mukhtar Abbas Naqvi’s outspokenness

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात