
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे. Police issues notice to Raj Thackeray, preventive action under section 149
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस देण्यात आली आहे.
राज ठाकरेंनी भोंगे उत्तरवण्यासंदर्भात उद्याचा अल्टिमेटम दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना कलम १४९ अंतर्गत मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईतील मनसेच्या विभागप्रमुखांना पुढील १५ दिवस शहराबाहेर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांच्या आवाहनामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मुंबई पोलीस आणि अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आलं आहे
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरुन उद्या मशिदींबाहेर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावण्याचे आवाहन केलं आहे. राज ठाकरे यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस देऊन पोलीस कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत. राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी औरंगाबाद येथे झालेल्या सभेसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या १६ अटीपैकी १२ अटींचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की, या देशात, या राज्यात ‘कायद्याचं राज्य’ आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. त्यांनी अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.
Police issues notice to Raj Thackeray, preventive action under section 149
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!
- चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट
- Raj Thackeray : ज्या मशिदींवरचे भोंगे उतरवले नाहीत, त्यांच्यासमोर हनुमान चालीसा लावाच!!; देशातल्या समस्त हिंदूंना आवाहन