चक्क केंद्रीय मंत्र्यांसमोर सुरू झाली पॉर्न फिल्म, इंडियन ऑईलला दाखवायचा होता पायलट प्रोजेक्ट


इंडियन ऑईलला आपला पायलट प्रोजेक्ट दाखवायचा होता. त्यासाठी प्रेझेंटेशन करताना चक्क पॉर्न फिल्म सुरू झाली. धक्कादायक म्हणजे या वेळी केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.The pilot project was to show Indian Oil, a porn film started in front of the Union Ministers


विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : इंडियन ऑईलला आपला पायलट प्रोजेक्ट दाखवायचा होता. त्यासाठी प्रेझेंटेशन करताना चक्क पॉर्न फिल्म सुरू झाली. धक्कादायक म्हणजे या वेळी केंद्रीय मंत्रीही उपस्थित होते.
आसाममधील तिनसुकियात शनिवारी हा प्रकार घडला.

येथील मिरानातील इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रिनवर अचानक पॉर्न चित्रपट सुरु झाला. यावेळी केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली आणि राज्याचे कामगार मंत्री संचय किसान उपस्थित होते. इंडियन ऑईलच्या मिथेनॉल मिश्रीत एम १५ पेट्रोलच्या पायलट रोलआऊटची सुरुवात या प्रसंगी करण्यात येत होते. व्यासपीठावर मोठी स्क्रीन लावण्यात आली होती. इंडियन ऑईलचे अधिकारी भाषण करत होते.



स्क्रिनवर मिथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रकल्पाचा व्हिडिओ क्लिप दाखवली जात होती. मात्र व्हिडिओ क्लिप बदलत असताना अचानक प्रोजेक्टरच्या स्क्रिनवर एक पॉर्न चित्रपट दिसू लागला. उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. सदरील व्हिडिओ काही सेकंद सुरु होता. ऑपरेटरने ताबडतोब तो बंद केला.

रामेश्वर तेली म्हणाले, मी इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्या चे भाषण ऐकत होतो. त्यामुळे माझे लक्ष स्क्रिनकडे नव्हते. मात्र माझ्या पीएने घडलेला प्रकार मला सांगितला. प्रोजेक्टर ऑपरेटला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

The pilot project was to show Indian Oil, a porn film started in front of the Union Ministers

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात