PM Modi : स्वागताचा मराठमोळा उत्साह; पंतप्रधान युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!


पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोपच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी जर्मनीचा दौरा आटोपून कालच डेन्मार्क गाठले. तेथे डॅनिश पंतप्रधानांसमवेत द्विपक्षीय वाटाघाटी केल्या, पण मोदींच्या नेहमीच्या परदेश दौऱ्या प्रमाणेच युरोप मधल्या भारतीयांशी संवाद साधण्याची संधी त्यांनी सोडली नाही. Welcoming Marathmola enthusiasm; The Prime Minister is on a tour of Europe or Maharashtra

पण मोदी हे युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…?? असा प्रश्न जो शीर्षकात विचारला आहे, त्याचे कारणही तसेच आहे…!! मोदींच्या युरोप दौऱ्यामध्ये जेवढे मराठमोळे स्वागत झाले आणि त्याची जेवढी चर्चा झाली, तेवढी बाकीच्या विषयांची झाली नाही. सरकारी पातळीवर मोदींचे दौरे वेगवेगळ्या कारणांसाठी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांचे महत्त्वही नक्की मोलाचे आहे. पण भारतीयांशी संवाद या कार्यक्रमात युरोपातील मराठी मंडळी विशेषत्वाने आघाडीवर दिसली. पंतप्रधान मोदींनी देखील मराठी मंडळींना अतिशय उत्साही प्रतिसाद दिल्याचे दिसले.

– जर्मनीत चान्सलरी समोर स्वागत

जर्मनीत राजधानी बर्लिनमध्ये प्रत्यक्ष चान्सलरी समोर म्हणजे जर्मन पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर मराठी मंडळींनी मोदींचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. त्यावेळी उत्साही मराठी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात पंतप्रधान मोदींच्या स्वागताला हजर होते. मोदींनी या सर्व मराठी मंडळींची आस्थेने चौकशी करून संवाद साधला.

– कोपनहेगन विमानतळावर स्वागत

जर्मनीतून मोदी डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन येथे पोहोचले. कोपनहेगनच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोदींचे सरकारी इतमामात स्वागत झाले. पण विमानतळावरच डेन्मार्कमधील मराठी तरुण-तरुणींनी मराठमोळ्या वेशात आणि ढोल-ताशांच्या गजरात मोदींचे स्वागत केले. या स्वागताचा मोदींनी सहर्ष स्वीकार तर केलाच, पण त्यांच्याजवळ जाऊन या युवकांशी संवादही साधला. मोदींबरोबर सेल्फी घेणे हा परदेश दौर्‍यातला नित्याचा कार्यक्रम आहे. तो बर्लिन आणि कोपेनहेगन मध्ये पार पडला.

– बेला सेंटर बाहेर मोदींचे ढोल वादन

मोदींनी कोपेनहेगन मधील आंतरराष्ट्रीय बेला सेंटरमध्ये भारतीयांशी संवाद साधला. यावेळी बेला सेंटरच्या बाहेर पुन्हा एकदा मराठी युवक युवक तरुण-तरुणींनी ढोल ताशाच्या गजरात मोदींचे स्वागत केले. या स्वागताचा विशेष म्हणजे स्वतः मोदींनी या मराठी युवक-युवतींनी बरोबर काही मिनिटे स्वतः ढोल वादनाचा आनंद घेतला…!!

– परदेशातली दुर्मिळ घटना

असे चित्र सर्वसाधारणपणे पंतप्रधान मोदींच्या अथवा कुठल्याही पंतप्रधानाच्या महाराष्ट्र दौऱ्यात दिसून येते. मोदी अथवा कोणतेही पंतप्रधान महाराष्ट्रातल्या स्थानिक ढोल पथकाबरोबर अथवा नृत्य पथकाबरोबर काही वेळ सामील होतात. पण परदेशात एखाद्या ठिकाणी नव्हे, तर 3 ठिकाणी मोदींचे ढोल-ताशांच्या गजरात असे मराठमोळे स्वागत होणे ही वेगळी घटना आहे. त्यामुळेच शीर्षकात विचारलेला प्रश्न पडला आहे, की मोदी युरोपच्या दौऱ्यावर आहेत की महाराष्ट्राच्या…??!!, इतकी आपुलकी मराठी मंडळींनी मोदींच्या स्वागतासाठी युरोपमधल्या शहरांमध्ये दाखवली आणि मोदींनीही त्यांना तितक्याच आपुलकीने प्रतिसाद दिला…!!

कोपनहेगन मधल्या बेला सेंटर मधल्या भाषणात त्यांनी प्रत्येक भारतीय भाषेचा उल्लेख करून डेन्मार्कच्या पंतप्रधानांना भारतातल्या विविधतेचे वर्णनही ऐकवावे. सर्व भारतीयांचा उत्साही प्रतिसाद बघून डेन्मार्कच्या पंतप्रधान भारावल्या होत्या.

Welcoming Marathmola enthusiasm; The Prime Minister is on a tour of Europe or Maharashtra

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात