भोग्यांचा त्रास काय असतो त्यांना समजू द्या म्हणत मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्रभरात हनुमान चालिसा लावावी असे पत्रक काढले आहे. Let them understand what is the problem of Bhonga, Raj Thackeray’s order to make Hanuman Chalisa in the entire state
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भोग्यांचा त्रास काय असतो त्यांना समजू द्या म्हणत मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावा असे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या महाराष्ट्रभरात हनुमान चालिसा लावावी असे पत्रक काढले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत भोंगे काढा अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा दिला होता. याचा पुनरोच्चार त्यांनी औरंगाबादेतील सभेतही केला होता. 3 मे ला ईद असल्याने आंदोलन करू नका, मात्र 4 मेला भोंगेबंद केले नाही तर लाऊडस्पीकर लावा असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यानंतर पोलिसांनी राज्यभरातील मनसेच्या जवळपास 15 हजार कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत.
राज ठाकरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मयार्दाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मयार्दा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे. लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी 10 डेसिबल आणि जास्तीत जास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो.
लक्षात घ्या, 10 डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि 55 डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज. हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मयार्दा घालायच्या, परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते?
म्हणूनच हिंदूंनो, त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App