महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे राेजी एका जाेडप्याचा थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरविण्यात आला. दाेन महिन्यापूर्वीच नियाेजीत वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने माेठया उत्साहात दाेघांचा बस्ता बांधला गेला. लग्नपत्रिका वाटप झाल्या, लग्नाची अंतिम तयारी करण्यात आली. परंतु लग्नाच्या पूर्वीच वधू काेणाला काही न सांगता पळून गेल्याने नाराज झालेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांनी पाेलीसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. Before marriage the girl run with unknown person, crime registered in police station
विशेष प्रतिनिधी
पुणे –महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे राेजी एका जाेडप्याचा थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरविण्यात आला. दाेन महिन्यापूर्वीच नियाेजीत वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने माेठया उत्साहात दाेघांचा बस्ता बांधला गेला. लग्नपत्रिका वाटप झाल्या, लग्नाची अंतिम तयारी करण्यात आली. परंतु लग्नाच्या पूर्वीच वधू काेणाला काही न सांगता पळून गेल्याने नाराज झालेल्या नवरदेवाच्या कुटुंबीयांनी पाेलीसांकडे धाव घेत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
यासंर्दभात विमानतळ पाेलीस ठाण्यात ६३ वर्षाच्या वरपित्याने संबंधित तरुणी, तिचे आईवडील व भाऊ यांचे विराेधात तक्रार दाखल केली अाहे. सुषमा आणि राहूल (नावे बदललेली आहे) यांचे एक मे राेजी नियाेजित लग्न ठरलेले हाेते. त्याबाबत लग्नाची सर्व बाेलणी हाेऊन २७ मार्च राेजी दाेघांच्या सुपारी फाेडण्याचा कार्यक्रम ही उत्साहात पार पडला हाेता.
लग्नाकरिता बस्ता बांधण्यासाठी वर पित्याने ८० हजार, लग्न पत्रिकेसाठी सात हजार, लग्न जमवणे, लग्न विधी, जेवण आदी कार्यक्रमाचे ७५ हजार रुपये असा एक लाख ७५ हजार रुपये खर्च केला. एक मे राेजी विवाहासाठी सर्व तयारी केली असताना नववधु ही लग्नापूर्वीच काेणातरी साेबत पळून गेल्याने पाहुण्यात व समाजात आपली बदनामी झाली. तसेच लग्नाचा खर्च करण्यास सांगुन फसवणुक करण्यात आल्याने याबाबत वधू पित्याने पाेलीस ठाणे गाठत पाेलीसांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. याबाबत विमानतळ पाेलीस पुढील तपास करत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App