Modi In Europe : व्यापार, संरक्षण, ग्रीन एनर्जी, युक्रेन टॉप अजेंड्यावर!!; 65 तास, 25 बैठका!!; नॉर्डिक संमेलन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना नंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2022 मधील पहिल्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. मोदी युरोप दौऱ्यावर रवाना झाले. तीन दिवसांचा हा दौऱ्यात व्यापार, संरक्षण, ग्रीन एनर्जी सिक्युरिटी आणि युक्रेन युध्दावर तोडगा हे विषय अजेंड्यावर आहेत. Trade, defense, green energy, Ukraine on top agenda

जर्मनी, डेनमार्क आणि फ्रान्स या तीन देशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देतील. रविवारी रात्री नरेंद्र मोदी या दौऱ्यासाठी रवाना झाले. जर्मनीपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्याचा शेवट फ्रान्समध्ये होणार आहे.

– नॉर्डिक संमेलनात भाग

दरम्यानच्या काळात ते नॉर्डिक देशांच्या संमेलनात भाग घेतील. उत्तर आर्टिक प्रदेशातील आईसलंड, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड या देशांचा त्यात समावेश होतो. भारत नॉर्डिक संमेलन 2018 मध्ये सुरू झाले. मध्यंतरी कोरूना काळामुळे यामुळे त्यात खंड पडला 2022 मध्ये दुसरी संमेलन होत आहे. यात मोदी भाग घेतील. या देशांच्या पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा करू ग्रीन एनर्जी, संरक्षण आणि व्यापारविषयक करार करतील.

रशिया युक्रेन यांच्या युद्धातच होत असलेल्या मोदींच्या या दौऱ्यात द्विपक्षीय चर्चेसोबत आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल. त्याच प्रमाणे रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाबद्दल या दौऱ्यातील भेटीगाठी आणि बैठकांमध्ये या तिन्ही देशातील नेत्यांसोबत काय चर्चा होते, याकडेही संपूर्ण जगाचे लक्ष असणार आहे.

– मोदींचा व्यग्र कार्यक्रम

65 तासांत 25 बैठकांच्या भरगच्च कार्यक्रमासाठी जर्मनीपासून मोदींच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याला सुरुवात होईल. यावेळी जर्मनीच्या चॅन्सलसलोबत मोदींची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत दोन्ही देशांचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित असणार आहेत. भारत आणि जर्मनी इंटर गर्व्हन्मेंटल कन्सल्टेशनच्या सहाव्या फेरीची ही चर्चा महत्त्वपूर्ण आहे.

– डेन्मार्क व्हाया जर्मनी

जर्मनीनंतर मोदी डेन्मार्कमध्ये जातील. डेनमार्कमध्ये भारत आणि नॉर्डिक कराराची दुसरी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत करारासंबंधी वेगवेगळ्या पैलूंच्या अनुशंगाने चर्चा होणार आहे. डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी मोदींनी कोपेनहेगनला येण्याची निमंत्रण दिले आहे.

– फ्रान्समध्ये मॅक्रॉन भेट

दरम्यान, 4 मे रोजी नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा असेल. भारत आणि फ्रान यांच्यातील राजकीय संबंधांना 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दोन्ही देशाचे प्रमुख एकमेकांची भेट घेणार आहे. या भेटीदरम्यान, भविष्यातील राजकीय संबंधांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या रणनितीवर चर्चा होऊ शकते. फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी मॅक्रॉन नुकतेच निवडून आले होते. दुसऱ्यांना मॅक्रॉन निवडून आल्यानंतर मोदी त्यांचे यावेळी अभिनंदन करतील.

Trade, defense, green energy, Ukraine on top agenda

विशेष प्रतिनिधी 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात