Raj Thackeray : शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी; महाराष्ट्रात जातीवरून माथी भडकावली!!


प्रतिनिधी

संभाजीनगर : शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ऍलर्जी आहे. केवळ सत्तेसाठी, आमदार निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी १०-१५ वर्षे महाराष्ट्रातील जातीजातीत विष कालवले, असा गंभीर आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संभाजीनगरच्या जाहीर सभेत केला. Sharad Pawar is allergic to Hindu words

केंद्रात तुमचे सरकार होते, मग का जेम्स लेनला फरफटत आणले नाही? रामदास स्वामींवर तुम्ही ब्राह्मण म्हणून टीका करणार का? कशाला जातीवरून माथी भडकवता? रामदास स्वामी यांनी शिवरायांवर ज्या शब्दांत लिहिले आहे, तसे अजून कुणी लिहिले नाही. एका पत्रात रामदास स्वामी क्षमा मागतात शिवरायांची. गुरु शिष्याची माफी मागतो का? कुणी सांगितले रामदास स्वामी शिवरायांचे गुरु होते? पवारांना हिंदू या शब्दाची ऍलर्जी आहे. दररोज शाहू, फुले, आंबडेकर यांचा महाराष्ट्र म्हणतात. हो पण हे सगळे याआधी शिवरायांना पुजायचे. अठरा पगड जातींना घेऊन शिवरायांनी राज्य स्थापन केले. मतांसाठी विष कालवले, आमदार निवडून येण्यासाठी हे राजकारण केले. आज ते शाळा- महाविद्यालयांत पोहचले. याच्यासाठी जातीचे राजकारण केले. या अशा महाराष्ट्राचा दिवस साजरा करायचा का आम्ही? असा सणसणीत टोला राज ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.

प्रबोधनकार हिंदुत्ववादीच

पवार म्हणतात मी प्रबोधनकार वाचले पाहिजे. पवारांनी प्रबोधनकार सोयीचे वाचले आहेत. प्रबोधनकार हिंदू धर्म मानणारा, पूजा करणारा माणूस होता. ते भट भिक्षुकीच्या विरोधात होते, पण देव मानणारे होते. त्यामुळे त्याचे संदर्भ मी इथे देत आहे. प्रबोधनकारांची पुस्तके आणि त्याचे संदर्भ आणले आहेत. ‘माझी जीवनगाथा’ हे त्यांचे चरित्र आहे, त्यात पान क्रमांक १०१ वर ख्रिस्ती मिशनरींविरुद्ध संघटना त्यांनी स्थापन केली. नवरात्रोत्सव सार्वजनिक केला. उठ मराठा उठ पुस्तक पवारांनी वाचावे. महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शरद पवारांनी विष कालवले. कालपर्यंत स्वतःची जात सगळ्यांना प्रिय होती, पण दुसऱ्या जातीचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरु झाला. जेम्स लेनची पुस्तके काढली आणि ज्यांनी शिवरायांना घराघरात पोहचवले त्या बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धपकाळात छळायला सुरुवात केली. कशासाठी तर जातिद्वेषासाठी. रायगडाची समाधी कोणी बांधली, लोकमान्य टिळकांनी बांधली, मग त्यांना ब्राह्मण म्हणणार का? त्यांनी पहिले वर्तमानपत्र काढले त्यांचे नाव “मराठा” होते, हे पवार सांगत नाहीत. इतके वर्षे तुम्ही सत्तेत होते, मग खेचून आणायचे होते जेम्स लेनला. खडसावून विचारायचे होते. त्याच्यावरून तुम्ही १०-१५ वर्षे राजकरण केले. तो जेम्स लेन म्हणतो, मी असे म्हणालोच नाही. मग कशाला तुम्ही महाराष्ट्राची माथी भडकावली, असा सवालही राज ठाकरे यांनी विचारला.

शरद पवार नास्तिक, पण मी बोलल्यावर देव आठवला

शरद पवार म्हणतात, मी दोन धर्मात दुही माजवतो. तुम्ही जातीजातीत भेद करता, तेथून दुही माजते. शरद पवारांनी कधी तरी शिवरायांचा उल्लेख केला होता का? आता बोलायला लागले आहेत. जेव्हा मी यावर बोललो. आता व्हिडीओ फिरवत आहेत, गीतरामायण ऐकत आहेत आणि बाजूला शिवरायांचे पुस्तक आहे. त्या दिवशी मी म्हणालो, पवार नास्तिक आहे. केवढे झोंबले. लागले देवासोबत फोटो काढायला. शरद पवार, तुमची मुलगीच संसदेत म्हणाली होती कि, तिचे बाबा नास्तिक आहेत, मग कशाला देवासोबत फोटो काढत पुरावे देत आहात, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.

Sharad Pawar is allergic to Hindu words

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”