शिक्षणसंस्थांमध्ये राजकारण : उस्मानिया विद्यापीठाने राहूल गांधींच्या भेटीला परवानगी नाकारली, कॉंग्रेसच्या संघटनांना सुरू केले आंदोलन

शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून राजकारण करण्याच्या कॉंग्रेसच्या प्रयत्नांना उस्मानिया विद्यापीठाने हाणून पाडले आहे.कॉंग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्या सात मे रोजीच्या नियोजित भेटीला परवानगी नाकारली आहे. गैर राजकीय कार्यक्रम म्हणून ही भेट असल्याचे म्हणत असताना आता कॉंग्रेसच्या संघटनांनी विद्यापीठात आंदोनल सुरू केले आहे. Osmania University denies permission to visit Rahul Gandhi


विशेष प्रतिनिधी

हैद्राबाद : शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून राजकारण करण्याच्या कॉँग्रेसच्या प्रयत्नांना उस्मानिया विद्यापीठाने हाणून पाडले आहे. कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांच्या सात मे रोजीच्या नियोजित भेटीला परवानगी नाकारली आहे. गैर राजकीय कार्यक्रम म्हणून ही भेट असल्याचे म्हणत असताना आता कॉँग्रेसच्या संघटनांनी विद्यापीठात आंदोनल सुरू केले आहे.

भारतातील सर्वात जुन्या विद्यापीठांपैकी एक म्हणून उस्मानिया विद्यापीठ ओळखले जाते. विद्यापीठाने आपला निर्णय कॉँग्रेसच्या आयोजकांना लिखित स्वरूपात कळवला नाही. मात्र, कार्यकारी परिषदेने या भेटीस परवानगी नाकारली आहे. तेलंगणा राष्ट्र समितीच्या राज्य सरकारने यासाठी विद्यापीठावर दबाव आणला असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. कॉँग्रेस प्रणित संघटनांतील काही विद्यार्थ्यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विद्यापीठाला गांधींच्या भेटीला परवानगी देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली.


राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद तर सोडलेय, पण निर्णय ते स्वतःच घेतात, दुसऱ्याला घेऊ देत नाहीत!!; पी. जे. कुरियन यांचा हल्लाबोल


कॉँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार, 23 एप्रिल रोजी या कार्यक्रमासाठी परवानगीसाठी अर्ज केला आहे. ही भेट गैर राजकीय असल्याचेही म्हटले होते. मात्र, बैठकीत एका प्रशासकीय अधिकाऱ्याने निदर्शनास आणून दिले की 2017 पासून कार्यकारी परिषदेने कॅम्पसमध्ये राजकीय बैठकांसह गैर-शैक्षणिक कायक्रमांना वगळण्याचा ठराव केला आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विद्यापीठाच्या आवारात राजकीय आणि सार्वजनिक सभांना परवानगी न देण्याचे निर्देश दिल्यानंतर एक वषार्नंतर जून 2017 मध्ये हा ठराव मंजूर करण्यात आला होता. विद्यापीठात राजकीय घडामोडींमुळे सतत त्रास होत असल्याची तक्रार करणाºया काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

यावर उस्मानिया विद्यापीठाने म्हटले आहे की, उच्च शिक्षण देण्याच्या उद्देशाने या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. राजकीय बैठकांना यामध्ये परवानगी दिली जाणार नाही. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे कॅम्पसमध्ये निदर्शने सुरू आहेत. अनेक युवक काँग्रेस नेते आणि समर्थकांनी विद्यापीठात निदर्शने केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि टीआरएसशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांच्या संघटनांनी प्रति निषेध आंदोलन सुरू केले आहे.

Osmania University denies permission to visit Rahul Gandhi

विशेष प्रतिनिधी 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात