राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे एमायटी तर्फे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात २८ राज्यातील महिला आयोग अध्यक्षा सहभागी झाल्या आहेत.Nationl women’s commission organised three days workshop for state women’s commission president’s
विशेष प्रतिनिधी
पुणे – भारत तेव्हाच विश्वगुरू बनेल जेव्हा देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणू. त्यासाठी एक पाऊल पुढे टाकून सर्व स्त्रियांनी जोमाने कार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केले.Nationl women’s commission organised three days workshop for state women’s commission president’s
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे एमायटी तर्फे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , एमआयटी युनिव्हर्सिटीचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड आणि कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
रेखा शर्मा म्हणाल्या, महिलांना मागे ठेऊन कोणताही समाज प्रगती करुच शकत नाही. या आयोगाद्वारे स्त्रियांना सक्षम करण्यावर अधिक भर दिला जाता आहे. अन्याय, अत्याचाराच्या बेड्या तोडून स्त्रियां सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास धडपडतांना दिसतात. आता त्यांच्यातील नेतृत्व गुणांवर भर देऊन कार्य केले जात आहे. तसेच आर्थिक आणि राजकियदृष्या सक्षमीकरणावर काम करावयाचे आहे.
विजया रहाटकर म्हणाल्या,सुरक्षा, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण या चार स्तंभावर महिलांना खंबीर करण्याचे कार्य या आयोगाद्वारे केले जावे. पंतप्रधानांनी महिलांसाठी जनधन योजना, सुकन्या योजना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. राष्ट्रीय पोषण आहारात वृद्धि झाल्याने महिलांच्या मृत्यदर ३० टक्यांनी कमी झाला.
प्रधानमंत्री आवास योजना, ट्रिपल तलाकचा कायदा आणि २ कोटी पेक्षा अधिक मुस्लिम बालिकांना या देशात स्कॉलरशीप दिली जात आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणाली त्यातून १८ कोटी महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. त्याच प्रमाणे कायद्यात बदल करून १२वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणार्यास फाशीची शिक्षा दिली जावी.
या आयोगाद्वारे दोन विभागात कार्य केले जाते. त्यात प्रथम म्हणजे अत्याचार होणार्या महिलांना न्याय मिळवून दिला जातो. दुसरे म्हणजे संशोधन करुन सरकारला माहिती दिली जाते.रूपाली चाकणकर म्हणाल्या,स्त्रियांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत करून एकजुटीने कार्य करावयाचे आहे. त्यांना शिकविणे, समर्थन देणे आणि स्त्रियांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजना राबविले जात आहेत. गर्भापासून ते मृत्यूपर्यंत महिलांचा जो प्रवास आहे त्यात तिचे बलिदान खूप मोठे आहे. महिलांचा विकास याच एका उद्देशाने ही परिषद भरविण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App