पतीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन त्याला गावी न राहता पुण्यात नाेकरी करुन राहण्याचा आग्रह धरत पत्नीने व सासरच्या लाेकांनी त्रास दिल्याने पतीने नाईलाजस्तव कुर्ला, मुंबई येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे -पतीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन त्याला गावी न राहता पुण्यात नाेकरी करुन राहण्याचा आग्रह धरत पत्नीने व सासरच्या लाेकांनी त्रास दिल्याने पतीने नाईलाजस्तव कुर्ला, मुंबई येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सतीश शिवलिंग घाेडके (वय-६०,रा.नांदेड) यांनी याप्रकरणी पाेलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. Wife harrasment husband succide in kurla railway station
पाेलीसांनी याप्रकरणी त्यांची सुन शुभांगी सतीश घाेडके (२६), विजय गणपतराव मालीपाटील (३२), जयश्री गणपतराव मालीपाटील (५२), गणपतराव मालीपाटील (५७) यांचेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सतीश व शुभांगी यांचे मे २०१६ मध्ये लग्न झाले हाेते. त्यानंतर पतीच्या चारित्र्यावर पत्नी सातत्याने संशय घेत हाेती तसेच गावी न राहता त्याने पुणे येथे नाेकरी व राहण्याची आग्रह धरला.
त्याचप्रमाणे पतीच्या काेणीही नातेवाईक व आईवडीलांनी घरी येऊ नये व त्यांना भेटु नये तसेच त्याने आईवडीलांना आर्थिक मदत करु नये अशा कारणावरुन वेळाेवेळी मानसिक त्रास दिला. या त्रासला कंटाळून त्रास असहय्य झाल्याने त्याने पुण्यातील धानाेरी येथील राहत्या घरातून निघून कुर्ला येथे जाऊन रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. याबाबतचा गुन्हा कुर्ला रेल्वे पाेलीस स्टेशन येथून शून्य क्रमांकाने विमाननगर पाेलीस ठाण्यात पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App