पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंजाब विधानसभेतही प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या महिला आमदार एकमेकांना भिडल्या. विधानसभेतील गदारोळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला आमदार एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. त्या एकमेकांचे केसही ओढताना दिसतात.WATCH Video of freestyle fight of Pakistani women legislators, video of viral quarrel goes viral
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पंजाब विधानसभेतही प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या महिला आमदार एकमेकांना भिडल्या. विधानसभेतील गदारोळाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला आमदार एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. त्या एकमेकांचे केसही ओढताना दिसतात.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी पंजाब प्रांताचे राज्यपाल चौधरी सरवर यांची हकालपट्टी केली, तर नवीन प्रांतीय मुख्यमंत्र्याची निवड पुढे ढकलण्यात आली.
Punjab Assembly in Lahore today. The political temperature is clearly soaring across the country that needs to be arrested. pic.twitter.com/X5swAP2zlu — Aamir Saeed (@AamirSaeed_) April 3, 2022
Punjab Assembly in Lahore today. The political temperature is clearly soaring across the country that needs to be arrested. pic.twitter.com/X5swAP2zlu
— Aamir Saeed (@AamirSaeed_) April 3, 2022
गदारोळामुळे निवडणूक पुढे ढकलल्याचा दावा सभापती कार्यालयाने केला
नॅशनल असेंब्लीच्या पावलावर पाऊल ठेवत पंजाब विधानसभेचे उपसभापती सरदार दोस्त मुहम्मद मजारी यांनी इम्रान खान सरकार पाडण्याच्या “आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा” हवाला देत मुख्यमंत्रिपदाची निवडणूक घेण्यास नकार दिला आणि अधिवेशन 6 एप्रिलपर्यंत तहकूब केले. त्यानंतर सभागृहातील गदारोळामुळे मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी कामकाज तहकूब करण्यात आल्याचे सभापती कार्यालयाने सांगितले.
चौधरी परवेझ इलाही हे सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) युतीचे उमेदवार होते, तर संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार पीएमएल-एनचे अध्यक्ष आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे पुत्र हमजा शाहबाज होते.
उमर सरफराज यांची नवीन गव्हर्नर म्हणून नियुक्ती
पंजाब विधानसभेचे अधिवेशन नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनाबरोबरच होते. सकाळी पंतप्रधान खान यांनी पंजाबचे राज्यपाल सरवर यांची हकालपट्टी केली आणि त्यांच्या जागी उमर सरफराज यांची नियुक्ती केली.
सरवर यांनी केला हा दावा
दुसरीकडे, बडतर्फ सरवर यांनी “इमरान खान यांच्याशी संबंधित पुष्कळ गोपनीय माहिती” असल्याचा दावा केला आहे, ते म्हणाले की ती सार्वजनिक करण्यास भाग पाडले जाऊ नये. ते म्हणाले की खान यांनी त्यांच्या पक्षाच्या विरोधाला न जुमानता “अपात्र मुख्यमंत्री उस्मान बुझदार” यांना निवडले.
सरवर म्हणाले की, खान यांनी त्यांना राज्यघटनेचे उल्लंघन करून मध्यरात्री पंजाब विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यास सांगितले होते. सरवर यांनी पुढे दावा केला की, त्यांनी दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App