प्रतिनिधी
मुंबई : किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब हे हातोडा राजकीय नाट्य कोकणातले शिगेला पोहोचले असून अनिल परबांच्या साई रिसोर्टकडे हातोडा घेऊन निघालेल्या किरीट सोमय्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या बरोबरच्या १५० कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून दूर करण्यात आले असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते घातपात करीत आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.Somaiya V/S Parab : kirit somaiya alleged NCP and shivsena are conspiring against him
सोमय्या यांनी दापोली पोलीस स्टेशनसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात माजी खासदार निलेश राणे आणि किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या हे देखील सहभागी झाले आहेत.
कोकणात दुपारपासून हातोडा राजकीय नाट्य सुरू आहे. किरीट सोमय्यांना पोलीसांनी ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे. दापोलीत १४४ कलम लावले आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने दापोलीतील साई रिसॉर्टकडे जाऊ नये, असे एसपींनी लेखी दिले आहे. ते माझी सुरक्षा करायला सक्षम नाहीत. हे माफिया सेनेचे पोलीस आहेत. मला राष्ट्रवादी आणि शिवसेना घातपात करणार हे माहिती होते, तर घातपात करणाऱ्यांना पोलीसांनी अटक का नाही केली, असा सवाल किरीट सोमय्यांनी यांनी दापोली पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन सुरू केल्यावर केला आहे.
अनिल परबांचे प्रतिआव्हान
कोकणातल्या दापोलीत किरीट सोमय्या हातोडा घेऊन राजकीय नाट्य घडवत आहेत, तर इकडे अनिल परब मुंबईत बसून किरीट सोमय्या यांना प्रतिआव्हान देत आहेत.अनिल परब यांच्या दापोलीतल्या साई रिसॉर्टवर सोमय्या प्रतिकात्मक हातोडा घेऊन तोडायला चालले आहेत. यावरून शिवसेना आणि भाजप तसेच मध्येच राष्ट्रवादी यांच्यात राजकीय नाट्य सुरू आहे.
किरीट सोमय्या यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे ते रत्नागिरीच्या दिशेने निघाल्यावर त्यांना कशेडी घाटात पोलिसांनी अडवले 149 कलमानुसार तुम्हाला तेथे जाता येणार नाही, असे पोलिसांनी सांगताच सोमय्यांनी त्यावर या नोटीसवर स्वाक्षरी करायला करायला नकार देऊन ते पुढे निघून गेले. दापोलीत त्यांना भाजपचे आमदार नितेश राणे जॉईन झाले.
या दरम्यान भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करून घेतले आहे. सध्या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते दापोलीतल्या रस्त्यावर जमले आहेत.तिकडे दापोलीतील सोमय्या हातोडा राजकीय नाट्य घडवत असताना इकडे अनिल परब यांनी सोमय्या यांना आव्हान दिले आहे. जो रिसॉर्ट सोडायला सोमय्या चालले आहेत तो रिसॉर्ट आपला नाहीच, असा दावा अनिल परब यांनी केला आहे.
तो रिसोर्ट तोडायचा असेल तर तो न्यायालयाच्या आदेशाने तोडला पाहिजे. सोमय्या हे काय न्यायालय आहेत का? की पालिकेचे अधिकारी आहेत असा सवाल त्यांनी केला आहे. केवळ आपली बदनामी करण्यासाठी कॅरेट सोमय्या हातोडा नाट्य घडवत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला ते लवकरच या रिसॉर्ट संदर्भात हायकोर्टात जाणार आहेत.
किरीट सोमय्या दापोलीच्या जवळ पोहचले असून त्यांच्यासोबत भाजप नेते निलेश राणेही आहेत. पण किरीट सोमय्यांना अडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी दापोली चौकात ठिय्या मांडून बसले आहेत. हातात काळे झेंडे घेऊन राष्ट्रवादी व शिवसेनेची कार्यकर्ते तेथे असून दुसरीकडे सोमय्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्तेही तेथे उपस्थित आहेत.
तत्पुर्वी कशेडी घाटात सोमय्यांचा ताफा पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांकडून सोमय्यांना नोटीस देण्यात आली पण सही न करता ती त्यांनी स्विकारली होती. आता किरीट सोमय्या कशेडी घाटातून खेडमार्गे ते दापोलीत पोहले. पण त्यांना चर्चेसाठी बोलवून पोलीसांनी ताब्यात घेतले आणि नंतर चौघांना सोडून दिले. आता सोमय्या पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App