आराेग्य भरती ‘गट-क’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात दाेषाराेपत्र दाखल


आराेग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट-क’ संर्वगाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता.याबाबतचा तपास पाेलीसांनी करत, १२५० पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात सादर केले आहे.


विशेष प्रतिनिधी 

पुणे – आराेग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ‘गट-क’ संर्वगाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला हाेता. याप्रकरणी पुणे सायबर पाेलीसांनी आतापर्यंत एकूण ११ आराेपींना अटक केली आहे. याबाबतचा तपास पाेलीसांनी करत, १२५० पानांचे दाेषाराेपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात सादर केले आहे.  Pune cyber police filed Chargesheet in Health Department ‘C’ class exam fraud case

याप्रकरणात निशीद रामहारी गायकवाड (वय-४३,रा.नागपूर), राहुल धनराज लिंगाेट (३५,रा.अमरावती), अशुताेष वेदप्रिय शर्मा (३८,रा.दिल्ली), विजय विनायक नागरगाेजे (३१,रा.बीड), अतूल प्रभाकर राख (३०,रा.पाटाेदा, बीड), महेश सत्यवान बाेटले (रा.मुंबई), प्रशांत व्यंकटराव बडगिरे (रा.आबेजाेगाई,बीड), डाॅ.संदीप त्रिंबकराव जाेगदंड (रा.आबेजाेगाई, बीड), शाम म्हादु म्हसके (रा.अंबाजाेगाई,बीड), गाेपीचंद रामकृष्ण सानप (२८,रा.पाटाेदा,बीड), नितीन सुधाकर जाऊरकर (४६,रा.अमरावती) या आराेपीं विराेधात दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. अद्याप दहा आराेपी पाहिजे असून त्यांचा पाेलीस शाेध घेत आहे. पाेलीसांनी याप्रकरणात एकूण १५ साक्षीदारांचे जबाब नाेंदवले आहे. पाेलीस उपआयुक्त भाग्यश्री नवटके ,एसीपी विजय पळसुले, वपाेनि डी.हाके यांचे मार्गदर्शनाखाली याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक मिनल पाटील करत आहे.

मंगलकार्यालयातील सीसीटीव्ही जप्त

२४/१०/२०२१ राेजी आराेग्य विभागातील गट-क संर्वगातील पदाच्या निवडीच्या लेखी परीक्षेचा पेपर परीक्षेच्या वेळेपूर्वी संबंधित आराेपींनी पेपर स्वत:च्या फायद्याकरिता पैसे स्विकारुन फाेडला. पेपर परीक्षेपूर्वी फाेडून ताे परीक्षार्थींना आराेपींनी पुरवून शासनाची व सदर परीक्षेला बसलेल्या प्रामणिक विद्यार्थ्यांची त्यांनी फसवणुक केली. परीक्षेच्या आदल्या दिवशी एजंट मार्फेत संर्पकात आलेल्या परीक्षार्थींना मंगलकार्यालय, हाॅल मध्ये एकत्रित करुन आराेपींना त्यांना पेपर दाखवला.याबाबत आळंदी येथील एका मंगलकार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजही पाेलीसांनी जप्त केले आहे. परीक्षेचा पेपर फाेडण्याकरिता आराेपींनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ११ ते १५ लाख रुपये स्विकारल्याने चाैकशीत निष्पन्न झाले आहे.

Pune cyber police filed Chargesheet in Health Department ‘C’ class exam fraud case

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था