भांडणे साेडविण्यासाठी गेलेल्या पाेलीसाच्या हातावरच कोयत्याने वार


किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे Police constable injured in katraj area


विशेष प्रतिनिधी 

पुणे -किरकाेळ कारणावरुन सुरु असलेले वाद साेडविण्याकरिता गेलेल्या एका पाेलीस कर्मचाऱ्यावर टाेळक्याने काेयत्याने वार केल्याने पाेलीस शिपयाच्या हाताला गंभीर जखम झाल्याची घटना घडली आहे. पाेलीस शिपाई मनाेज बदडे असे जखमी झालेल्या पाेलीसाचे नाव आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पाेलीसांनी आराेपी कैफ अरिफ शेख (वय-१८) याला अटक केले असून त्याचे साथीदार आमन मुल्ला, संकेत व एक आणखी साथीदार यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पाेलीसांकडे प्रतिम लाेणकर (वय-३०,रा.कात्रज,पणे) यांनी फिर्याद दिली आहे.

तक्रारदार प्रितम लाेणकर हा गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कात्रज चाैकातील हाॅटेल गणेश येथे मित्रांसाेबत चहा पिण्याकरिता गेला हाेता. त्याठिकाणी गाडी पार्क करत असताना, त्याचा एका २० वर्षीय तरुणासाेबत वाद झाला. त्यावेळी संबंधित तरुणाने त्याला शिवीगाळ करुन ‘तुला मी काेण आहे ते दाखविताे’ असे म्हणून त्याने त्याठिकाणी असलेल्या इतर साथीदारांना बाेलवून घेतले. त्यानंतर लाेणकर यास आमन मुल्ला व संकेत यांनी हाताने पकडून ठेवले व मारहाण केली.यावेळी कैफ याने त्याच्याकडील काेयता काढून ताे लाेणकर यास जीवे ठार मारण्याचे उद्देशाने वार केला. त्यावेळी सदर भांडणे पाहून जवळच वाहतूक नियमन करणारे पाेलीस शिपाई मनाेज बदडे धावत येऊन त्यांनी भांडणे साेडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कैफ याने वाहतूक पाेलीसावर काेयत्याने वार करुन त्याच्या करंगळीला जखम केली.  याबाबत भारती विद्यापीठ पोलीस पुढील तपास करत आहे.

Police constable injured in katraj area

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था