वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील जिहादी हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाने या प्रकरणी 7 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारला हा तडाखा मानण्यात येत असून सध्या त्यांच्या सरकारने नेमलेली एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे.Kolkata High Court slams Mamata Banerjee government; CBI probe into Birbhum violence
भादू शेख हत्येनंतर हिंसाचार
बीरभूम येथे 22 मार्च रोजी तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचार उसळला होता. त्यात एका घराला लावलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात पीडितांना जिवंत जाळण्यापूर्वी मारहाण करण्यात आल्याचाही धक्कादायक बाब समोर आली होती. बंगाल सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती.
अनिरुल हुसैन सह 20 जणांना अटक
तसेच याप्रकरणी आतापर्यंत 20 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. घटनेनंतर गुरुवारी (दि. 24) तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अनिरुल हुसैन यांना बीरभूम हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यानंतर काही तासांतच हुसेनची अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी हुसेनला तारापीठ येथील हॉटेलमधून अटक केली आहे.
टीएमसीने दिले स्पष्टीकरण
स्थानिक शत्रुत्वातून ही घटना घडल्याचा दावा तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला. त्यांनी ट्विट केले की, रामपूरहाट आगीच्या घटनेतील मृत्यू दुर्दैवी आहेत पण त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. तृणमूल काँग्रेसचे बीरभूम जिल्हा प्रमुख अनुब्रत मंडल यांनी सांगितले की, भादू शेखचा मृतदेह सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पोलीस तपासणी करत आहेत. जाळपोळीच्या घटनेबाबत दावा करत त्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले आहे.
ममता बॅनर्जींकडे मागितला राजीनामा
या घटनेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री आणि राज्याच्या गृहमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी जाळपोळीची घटना म्हणजे नरसंहार असल्याचे म्हटले आहे. सलीम यांचा आरोप आहे की, या घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना तपास आणि सत्य दडपण्यासाठी करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App