नांदेड येथील एका सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे पुण्यातून अपरहरण करून 25 लाखांची रोकड लुटणार्या तोतया ऍन्टी करप्शन पोलिसांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे –नांदेड येथील एका सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे पुण्यातून अपरहरण करून लुटणार्या तोतया ऍन्टी करप्शन पोलिसांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. आठ दिवस आरोपींचा दिवसरात्र पाठलाग करून मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 25 लाखाची लुटलेली रोकड , दोन गावठी पिस्तूले, चारचाकी गाडी असा तब्बल 33 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण आदी उपस्थित होते.Swarget police solve the 25 lakhs cash stolen case & Arrested 5 accused in Nanaded, Madhya Pradesh,uttar pradesh
शरिफ मोहमंद सरवर शेख (वय.54,रा.नांदेड), विपीन द्वारकादास तिवारी (वय.35,रा. इंदौर मध्यप्रदेश), कपील विरसिंग यादव (वय.29,रा. झाशी उत्तरप्रदेश), भूपेंद्र शामलाल राय (वय.30, रा. बिना, मध्यप्रदेश),शैलेंद्रकुमार रामसेवक राय (वय.31,रा. उरई, उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर नोकरनांदेडहून पुण्यात सोने खरेदीसाठी आलेल्या सराफ व्यवसायिकाच्या नोकराचे ’ऍन्टी करप्शन’ चे पोलिस असल्याचे बतावणी करून, पिस्तूलाच्या धाकाने अपहरण केले.
त्यानंतर हातपाय बांधून 27 लाख 58 हजार रूपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना स्वारगेट येथील वेगा सेंटर समोर सात मार्च रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात व्यवसायिक मधुरम सत्यानारायण सोनी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोनी यांचा कर्मचारी शंकर भालेराव याचे ताब्यातून ही रोकड लुटण्यात आली होती.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना स्वारगेट पोलिसांनी नांदेडपासून पुण्यापर्यंतचे अनेक सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी केली. शर्मा ट्रॅव्हल्स्च्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या पाहणीत शरिफ मोहमंद पोलिसांना संशयास्पदरित्या घुटमळत असताना दिसून आला. तांत्रिकविश्लेषनाद्वारे पडताळणी केली असता, पोलिसांचा संशय वाढला.
त्याला बीड येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, अपहरण करून लुटलेल्या गुन्ह्यांचा छडा लागला. शरिफ मोहमंद याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी सोमनाथ कांबळे, संदीप साळवे, सचिन दवळवी, शैलेश वाबळे, ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांच्या पथकाने आठ दिवसात मध्यप्रेदशातील इंदौर, झाशी व उत्तरप्रेदशातील विविध भागातून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत रेकी करून सराफ व्यवसायिकाच्या नोकराला लुटल्याची कबुली दिली.
असा रचला कट..
आरोपी शरिफ मोहमंद हा मुळचा नांदेड येथील राहणारा आहे. त्याच्यावर विविध प्रकारचे 13 गुन्हे दाखल आहे. नांदेड येथील सराफ व्यवसाबद्दल त्याला माहिती आहे. शरिफ हाच गुन्ह्याचा मुख्यसुत्रधार असून, त्यानेच ही योजना रचली. त्यासाठी शरिफ याने मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातील गुन्हेगारी टोळ्यांची मदत घेतल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एक महिन्यापासून शरिफ याने शंकर भालेराव याच्यावर पाळत ठेवली. 6 मार्च रोजी भालेराव हे शर्मा ट्रॅव्हल्स्मध्ये बसून पुण्याला निघाल्याची माहिती इतर चार आरोपींना दिली.
परराज्यातील आरोपी अगोदरच काही दिवस नांदेड येथे येऊन थांबले होते. आरोपींनी भालेराव बसलेल्या ट्रॅव्हल्स्चा पाठलाग करून संधी मिळताच 7 मार्च रोजी सकाळी स्वारगेट येथील वेगासेंटर परिसरात भालेराव याच्या खाद्यावर हात टाकून ’ ऍन्टी करप्शन’ चे पोलिस असल्याची बतावणी केली. तसेच पिस्तूला सारख्या शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर त्याला चौघांनी जबरदस्तीने एका कारमध्ये बसविले. कारमध्ये बसविल्यानंतर त्याचे हातपाय व तोंड चिकपट्टीने बांधले. त्याच्याजवळील 17 लाख 58 हजार रूपयांची रोकड असलेली बॅग घेतली. यानंतर शंकर याला अज्ञात स्थळी सोडून दिले. मात्र बॅगमध्ये 27 लाखाची रोकड असल्याचे समोर आले होते
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App