PARAMBIR SINGH : परमबीर यांच्याविरुद्ध तक्रारींचा तपास CBI करणार ; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ! राज्य सरकारला दणका


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणात राज्य सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे. परमबीर यांच्यावरिुद्ध दाखल करण्यात आलेल्या पाचही गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार आहे.PARAMBIR SINGH: CBI to probe all five complaints filed against Parambir; Important decision of the Supreme Court


सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत यावर शिक्कामोर्तब केलं. जस्टीस संजय कौल आणि जस्टीस एम.एम.सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे.राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले सर्व खटले सीबीआयकडे(CBI) वर्ग करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना आठवडाभरात रेकॉर्ड सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे.PARAMBIR SINGH: CBI to probe all five complaints filed against Parambir; Important decision of the Supreme Court

जेव्हा गृहमंत्री आणि आयुक्त अशा प्रकारचे आरोप एकमेकांवर करतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. यासाठी सत्य समोर येणे आवश्यक असून त्यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह एकमेकांवर आरोप करत आहेत. यामुळे जनतेचा व्यवस्थेवरील विश्वास उडाल्याचे टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. ”सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे, पण परमबीर सिंह आणि माजी गृहमंत्री एकमेकांवर ज्या प्रकारचे आरोप करत आहेत त्यामुळे लोकांचा व्यवस्थेवरील विश्वासाला तडा गेला आहे”, असे न्यायालयाने म्हटले आहे.

PARAMBIR SINGH: CBI to probe all five complaints filed against Parambir; Important decision of the Supreme Court

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात