वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी व्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर आणि तीन जीवरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Wanavdi Police registered crime against swimming pool contractor, life gaurds
विशेष प्रतिनिधी
पुणे – महापालिकेच्या जलतरण तलावात मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वानवडीतील भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये घडली होती. याप्रकरणी व्यवस्थापक, कॉन्ट्रॅक्टर आणि तीन जीवरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Wanavdi Police registered crime against swimming pool contractor, life gaurds
गणेश पुंडलिक पाटोळे (वय 17, महंमदवाडी,पुणे) याचा रविवारी पोहताना बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी बापुसाहेब केदारी जलतरण तलावाचे व्यवस्थापक विनोद रामलिंग गायकवाड, ठेकेदार अजयकुमार नागेश्वर सिंग यांच्यासह तीन जीवरक्षकांवर गुन्हा दाखल केला असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. साठे यांनी सांगितले.
गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या महापालिकेच्या भाऊसाहेब केदारी जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी गणेश अठरा वर्षाच्या आतील असताना देखील पोहण्यासाठी त्याच्या पालकांचे संमंतीपत्र घेण्यात आले नाही. 20 लोकांमध्ये एक जीवरक्षकाची नेमणुक करणे आवश्यक होते. यावेळी त्यांनी 77 हून अधिक पोहणारांसाठी केवळ तीनच जीवरक्षक नेमल्याचे आढळून आले. त्यांनी या जलतरण तलावात पोहण्यासाठी येणार्या लोकांची सुरक्षा धोक्यात आणल्याने व अक्षम्य निष्काळजीपणा केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App