प्रतिनिधी
बुलढाणा – मलकापूरमध्ये एचडीएफसी बँकेत बनावट नोटा भरल्याप्रकरणी खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एआयएमआयएमचा माजी बुलढाणा जिल्हाध्यक्ष शहेजाद खान सलीम खान याला पोलीसांनी अटक केली आहे.Fake Currency Racket : former AIMIM leader shezad khan salin khan arrrested
बनावट नोटा बँकेत भरल्याच्या प्रकरणात पोलीसांनी तीन दिवसांपूर्वी गुजरातमधलील इरफान हनीफ पटनी याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास करीत पोलिसांनी नंतर एक मोठी कारवाई करीत एमआयएमचा माजी जिल्हाध्यक्षाला शहेजाद शेखला अचक केली.
शहेजाद खान सलीम खान हा एएमआयएम या पक्षातून महिनाभरापूर्वी पायउतार झाला होता. तो मलकापूर नगरपालिकेचा नगरसेवक आहे. शहेजाद खान यांना मलकापूरातील मालीपुरा मंगलगेट परिसरातून बुधवारी अटक केली. नायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
23 फेब्रुवारी रोजी मलकापूर शहरातील एचडीएफसी बँकेत नकली नोटा जमा करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी ईरफान हनीफ पटनी मुळ रा. गुजरात ह. मु. वडनेर (भोलजी) याच्यासह खामगाव, मलकापुर, नांदुरा येथून आतापर्यंत सहा आरोपींना शहर पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे.
16 मार्च रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान शहर पोलिसांनी इत्तेहादुल मुस्लिमीन एएमआयएम या पक्षातून एक महिन्यापूर्वी पदावरून पायउतार करण्यात आलेला माजी जिल्हाध्यक्ष, नगरसेवक शहजाद खान सलीम खान याला अटक केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App