काँग्रेसचे मुख्यमंत्री बघेल यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिला अन् म्हणाले, फक्त हिंसा व अर्धसत्य दाखविले..!

विशेष प्रतिनिधी

रायपूर : जगभर औत्सुक्य चाळविणारा द काश्मीर फाइल्स हा काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांचे चित्रण दाखविणारा चित्रपट पाहणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे कदाचित पहिले काँग्रेस नेते असावेत. त्यांनी सहयोगी आमदारांबरोबर हा चित्रपट पाहिला, पण त्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया राजकीय होती.‘Half-truth’: Chhattisgarh CM Bhupesh Baghel critiques ‘The Kashmir Files’

ते म्हणाले, “काश्मिरी हिंदूंच्या दुर्देशेवर आधारित हा चित्रपट अर्धसत्य दाखवतो आणि त्यात हिंसा दाखवण्याशिवाय कोणताही चांगला संदेश नाही. काश्मीरमध्ये केवळ हिंदूच नाही तर बौद्ध, मुस्लिम, शीख यांचीही हत्या झाली. पण त्यावर चित्रपट मौन बाळगतो.



तो कोणताही उपाय सुचवत नाही आणि त्या दिशेने कोणताही प्रयत्न केला जात नाही. यात केवळ हिंसाच दाखवली आहे, ज्याला काही अर्थ नाही. चित्रपटाला राजकीय रंगदेखील दिला आहे. त्यावेळी भाजपच्या पाठिंब्याने व्ही.पी.सिंह यांचे केंद्रात सरकार होते, पण त्यांनी काश्मिरींचे विस्थापन थांबविण्यासाठी काही केले नाही. कै. राजीव गांधी यांनी लोकसभेत मागणी केल्यानंतर तिथे लष्कर पाठविण्यात आले.”

राज्यात चित्रपट करमुक्त करण्याची मागणी त्यांनी थेट फेटाळली नाही; पण मोदी सरकारनेच केंद्रीय जीएसटी रद्द करावा, असे त्यांनी सुचविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते.

३० वर्षांपासून दडविलेले सत्य सांगणारा हा चित्रपट आहे, असे ते म्हणाले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत गळे काढणारी एक जमात या चित्रपटाला मात्र विरोध करत असल्याचे सांगून त्यांनी डाव्या विचारवंत, बुद्धीजीवी व काँग्रेसला चिमटे काढले होते.

‘Half-truth’: Chhattisgarh CM Bhupesh Baghel critiques ‘The Kashmir Files’

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात