सोलापुरातील अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा भस्मसात; रिलायन्स कंपनीला फटका

वृत्तसंस्था

सोलापूर : सोलापुरात होम मैदानावर रिलायन्स कंपनीने साठा करून ठेवलेल्या अ‍ॅप्टिकल केबलचा साठा भीषण आगीत भस्मसात झाला. optical fiber cable at Solapur Stocks burnt; Reliance hit

आगीचे कारण समजू शकले नाही. मंगळवारी दुपारी आगीची घटना समजताच महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या यंत्रणेने त्वरित धाव घेऊन पाणी व रासायनिक द्रव्यांचा फवारा करून आग आटोक्यात आणली.होम मैदानावर जेथे अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा ठेवणला होता, तेथे खेटूनच रहिमतबी झोपडपट्टी आहे. सुदैवाने आगीची झळ झोपडपट्टीला बसली नाही.



शहरात गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्स कंपनीकडून अ‍ॅप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा मोठा साठा करू ठेवला होता. परंतु दुपारी अचानकपणे या केबलला आग लागली. आग लागून धुराचे लोट उंचावर पसरले होते. अ‍ॅप्टिकल फायबर केबल असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते.

दरम्यान, महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन पाण्याचे बंब आणि फोम नावाचे रासायनिक द्रव्य वापरून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र अ‍ॅप्टिकल फायबर केबलचा साठा एकत्र चिकटून ठेवण्यात आल्यामुळे आगीत मोठे नुकसान झाले.

 optical fiber cable at Solapur Stocks burnt; Reliance hit

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात