राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पुण्यातील पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हेगारीचा कट रचत, कशप्रकारे कागदपत्रे फेरफार करून खटाटेप केला हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीत समोर आले आहे.
प्रतिनिधी
पुणे -प्रतिष्ठेचे मानले जाणारे राष्ट्रपती पदक आपल्या पोलिस सेवेच्या कारकिर्दीच्या काळात मिळावे ही पोलिस अधिकाऱ्यां सोबतच कर्मचाऱ्यांची इच्छा असते. मात्र, सदर पदक मिळवण्यासाठी दरवर्षी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते, त्याला छेद देऊन गुन्हेगारी कट रचत पुण्यातील पोलिस कर्मचारी गणेश जगताप याने प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले आहे. कागदपत्रांची छाननी करणारे पोलिस उपायुक्त कार्यालयातील कनिष्ठ लिपीक नितेश अरविंद आयनुर, पोलिस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रवींद्र धोंडीबा बांदल आणि वानवडी पोलिस ठाण्यात 2019 मध्ये नेमणुकीस असलेले डे बुक अंमलदार यांच्याशी ‘आर्थिक तडजोड’ करून दोन वर्षाची वेतनवाढची झालेली शिक्षा गायब करून स्वतःचे स्वच्छ रेकॉर्ड तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.Pune police constable how implemented criminal conspiracy to get President award
पोलीस कर्मचारी आणि अधिकारी
यांना दरवर्षीराष्ट्रपती पदक प्राप्त करण्यासाठी गृह विभागाकडून पात्र कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात येते. त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांची कामगिरी म्हणजेच ” (सायटेशन) सादर करावे लागते. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवाशर्ती मधील शेरे, याबाबतचे मागील 10 वर्षातील रेकॉर्ड तपासण्यात येते.
संबंधित कर्मचाऱ्यास कामगिरीबद्दल किती सेवा पुरस्कार प्राप्त झाले, त्याला कोणती शिक्षा झाली आहे का? याबाबतची माहिती तपासण्यात येते. याबाबतचा प्रस्ताव तयार करून संबंधित पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मार्फत तो सदर भागातील परिमंडलच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात पाठवला जातो.
कार्यालयातील लिपिक त्याबाबतची छाननी करून त्याचा अहवाल पोलीस उपायुक्तांना देतो. पोलिस उपायुक्तांची सही झाल्यानंतर, सदर प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीसमोर जातो.पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक या प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून तो समिती समोर ठेवतात.
समितीने तो मान्य केल्यानंतर पोलीस महासंचालक यांच्याकडे तो शिफारशीसह पाठवण्यात येतो. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून त्याबाबतची छाननी करून, केंद्रीय गृह खात्याकडे राष्ट्रपती पदकासाठीसाठी तो पाठवला जातो.
त्यानंतर गुप्तचर विभाग, लाचलुचपत विरोधी विभाग, दहशतवाद विरोधी विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग आदी एजन्सीमार्फत संबंधित व्यक्तीची माहिती तपासण्यात येते. त्यानंतर तो राष्ट्रपतींकडे पदकासाठी पाठवला जातो.
चौकशीत प्रकार निष्पन्न
पोलीस हवालदार गणेश जगताप याने राष्ट्रपती पदकासाठी अर्ज पाठवला असता तो वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे आला.त्यावेळी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याला पोलीस कारकीर्दीत शिक्षा झाल्याची माहिती होती. त्यानुसार त्यांनी याबाबतची चौकशी सुरू करत त्याच्या सेवाशर्ती पुस्तकाची तपासणी केली असता, त्यात दोन पाने फाडून गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला. पोलीस ठाण्यातील डे बुक अंमलदार, पोलीस उपायुक्त कार्यालयातील लिपिक आणि पोलीस आयुक्त कार्यालयातील लिपिक यांना हाताशी धरून त्याने गुन्हेगारी कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीएचडीची पदवी केली प्राप्त
1992 साली पोलीस दलात रुजू झालेल्या गणेश जगताप याने पोलीस मुख्यालय, वाहतूक शाखा ,विशेष शाखा, गुन्हे शाखा आदी ठिकाणी काम केले आहे. त्याअंतर्गत 268 सेवा पुरस्कार तर मे 2017 साली पोलीस महासंचालक पदक प्राप्त केले आहे. सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यास 92 पुरस्कार प्राप्त झाले आहे.
नुकतेच कोईमतुर येथील दी एम्पायर युनिव्हर्सिटी कडून प्रसिद्ध अभिनेता सुमन यांच्या हस्ते त्याला तमिळनाडूचे राज्यपालांकडून पीएचडी पदवी प्रदान झाली आहे. गणेश जगताप याचे वडील ही पोलिस दलातून निवृत्त झालेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App